आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची कृषी शिक्षण समितीवर निवड

31

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.24जून):-वरोरा – भद्रावती विधानसभा मतदार संघाच्या आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची कृषी शिक्षणसंदर्भात नवीन धोरण निश्चित करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीवर सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हि नियुक्ती कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे सह सचिव बा. कि. रासकर यांनी केली. यामध्ये कृषी शिक्षणाचे धोरण निश्चित करण्यासाठी डॉ. एस. एन. पुरी माजी कुलगुरू यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञाची समिती गठीत करण्यात आली आहे.

वरोरा – भद्रावती विधानसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात शेती करण्यात येते. शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेण्याकरिता शेतीच्या बांधावर शेतकऱ्याशी संवाद साधत त्यांचे प्रश्न निकाली काढले होते. शेतकऱ्याच्या प्रश्नावर त्यांनी अनेकदा आवाज उठवला आहे. अभ्यासू आमदार अशी प्रतिभाताई धानोरकर यांची ओळख आहे. त्यांनी अल्पावधीतच महिला आमदार म्हणून ओळख निर्माण केली आहे.

कृषी बद्दल त्यांच्यातील अभ्यासू वृत्ती ओळखून त्यांची हि निवड करण्यात आली आहे. पुढे देखील या समितीच्या माध्यमातून नाव नवीन बाबींच्या समावेश करण्यात येईल व कृषी अभ्यासात विज्ञानाची व व्यवसायाची जोड देण्याच्या प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर व आमदार सुभाष धोटे यांनी शुभेच्छा दिल्या.