चितळा ला जीवदान

33

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.24जून):- येथील बस आगारात आज सकाळी एक जखमी चितळ सैरभैर अवस्थेत भटकले असता त्या जखमी चितळा ला पकडून त्याच्यावर उपचार करून जंगलात सोडण्यात आले. आज सकाळी एक चितळ येथील बस आगारात जखमी अवस्थेत शिरले.

याबाबत ची माहिती एस टी कामगार सेनेचे विभागीय उपाध्यक्ष नरेंद्र गाडगीलवार डेपो मॅनेजर भाग्यश्री कोडापे खेमु मेश्राम यांनी त्वरित वनविभागाला दिली . दरम्यान वन विभागाचे राउंड ऑफिसर सेमस्कर तथा वनरक्षक धुडसे यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी पूनम ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनाखाली त्या जखमी चितळाला पकडून त्याच्यावर उपचार केले .व लगेच त्या चितळाला जंगलात सोडण्यात आले.