निंबी, कवडीपुर ग्रा. प. अंतर्गत साई विहार लुंबिनी वन परिसरात वृक्षारोपण

29

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.24जून):-कोविड -१९ च्या महामारीने मानवी जीवनात ऑक्सिजनचे किती महत्त्व आहे .हे लक्षात आणून दिले .त्यामुळे वृक्ष संवर्धनाची कीती गरज आहे.कळले .वृक्षाचे महत्व लक्षात घेऊन व यवतमाळ जिल्हा परिषदेच्या अधक्ष्या सौ.कलिंदाताई पवार यांच्या संकल्पने एक गाव एक वडाचे झाड या नाविन्यपूर्ण उपक्रमानुसार पुसद तालुक्यातील निंबी,कवडीपुर ग्रा. प. अंतर्गत साई विहार लुंबिनी वन परिसरात ” वृक्षारोपण” कार्यक्रम राबविण्यात आला.

वड व पिंपळ हे वृक्ष मोठया प्रमाणात ऑक्सिजन देतात त्या मुळे वड ,पिंपळ इतर झाडांची लागवड सरपंच मयुर राठोड,मैत्रेय बुद्ध विहार समितिचे अध्यक्ष अरुण पाईकराव. ग्रा. प. सदस्य संजय सुर्यतळ ,किसन राठोड ,मनोज बुरकुले, सूरज गेंदराव,ग्रा वि अ सी.टी. पंडितकर ,सुरेंद्र कांबळे ,बाळासाहेब कांबळे, सुभाष गायकवाड,धम्मपाल पडघणे,विलास चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण झाले. ग्रा. प. अंतर्गत अनेक झाडे लावून संवर्धन करणार असल्याचे सरपंच मयुर राठोड यांनी सांगितले.