✒️तलवाडा प्रतिनिधी(शेख आतिख)

गेवराई(दि.24जून):-तालुक्यातील तलवाडा येथील शेतकरी राधाकिशन नाटकर वय ५२ वर्षे तलवाडा सर्कल मधील विठ्ठल नगर शिवारात त्यांच्या स्वाताच्या शेतातील विहीरीत उडी मारून कर्जबाजाराला कंटाळून आत्महत्या केली दिं.२४/६/२०२१ रोजी गुरूवारी सकाळी हा प्रकार उघडीस पडला आहे.सविस्तर दिं.२३/६/२०२१ रोजी घरी संध्याकाळी परतले नसल्याने सदरील मुलांनी व भावांनी आपल्या वडीलांचा शोध घेण्यात सुरूवात केली मात्र रात्रभर सुध्दा शोध लागला नाही मग आपल्या शेताकडे गेले असताना विहीरीत पाण्यावर तरंगत असल्याचे दिसुन आले या घटनेची माहिती मिळताच तलवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे यांनी तात्काळ बीट अंमलदार उध्दव राऊत,सह गायकवाड, यांना घटनास्थळी पाठवले होते.

तलवाडा प्रथामिक आरोग्य केंद्रात शवछेदनासाठी आण्यात आले होते. तलवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार उध्दव राऊत, पुढील तपास करीत आहेत बळीराम भानुदास नाटकर वय ४८ वर्ष व्यवसाय शेती रा.तलवाडा यांच्या फिर्यादीवरून तलवाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED