✒️शब्बीर सय्यद जहागीरदार(विशेष प्रतिनिधी)मो:-9623896574

जिवती(दि.24जून):- चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिवती तालुक्यातील टेकामांडवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला सद्यस्थितीत पशुवैद्यकीय दवाखान्याचे स्वरूप प्राप्त झाले असून आता तर चक्क दवाखान्यामध्ये लोकांनी बकऱ्या व मेंढ्या बांधायला सुरुवात केल्याचे चित्र दिसून येत आहे.

मागील पाच ते सहा वर्षांपूर्वी आदिवासी व अतिदुर्गम अशा आदिवासीबहुल प्रदेशातील लोकांच्या स्वास्थ्य विषयक समस्या निकाली निघाव्यात प्रत्येक नागरिकाला आरोग्यविषयक योजनांचा लाभ मिळावा याकरिता प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना करण्यात आली मात्र तेव्हापासून कोणत्याही प्रकारचा वैद्यकीय अधिकारी व इतर अधिकारी या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली नाही. लाखो रुपये खर्च करून आरोग्य केंद्राची इमारत उभी करण्यात आली रीतसर उद्घाटनही करण्यात आले परंतु आरोग्य केंद्राला मात्र अधिकारी गवसला नाही तयार करण्यात आलेली वस्तू जीर्ण व्हायला लागली.

तर यांनी याच गोष्टीचा फायदा घेत तिथे शेळ्या व मेंढ्या बांधायला सुरुवात केली आरोग्य केंद्राला वैद्यकीय अधिकारी मिळावा लोकांना वैद्यकीय सेवा व सुविधा प्राप्त व्हाव्यात याकरिता स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून अनेकदा शासनाला पत्र व्यवहार करण्यात आला. अनेकदा निवेदनही देण्यात आली मात्र याचा कोणताही फायदा न झाल्यामुळे शेवटी मानवा वरती औषध उपचार करण्याकरिता निर्माण केलेल्या वास्तूचा उपयोग पशुवैद्यकीय दवाखान्या सारखा करायला लोकांनी सुरुवात केली.

टेकामांडवा या गावाच्या परिसरातील अनेक गावातील लोकांच्या आरोग्य विषयक समस्यांची शृषा वावी प्रत्येकाला उत्तम आरोग्य लाभो याकरिता परिसरातील नागरिकांना जिवती व गडचांदूर या ठिकाणी धाव घ्यावी लागते यापेक्षा दुसरे दुर्भाग्य कोणते सद्यस्थितीत सर्वत्र कोरोना सदृश्य परिस्थिती असल्यामुळे प्रत्येकाला कोरोना प्रतिबंधात्मक लस मिळावी याकरिता शासनाच्या वतीने सचोटीने प्रयत्नाची पराकाष्टा केली जात असताना गावात प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत उपलब्ध असताना केवळ त्या ठिकाणी शासकीय मनुष्यबळाचा अभाव असल्यामुळे ग्रामपंचायतीमध्ये लसीकरण करण्यात येत आहे अशा आणि अनेक समस्या टेकामांडवा व परिसरातील नागरिकांना सतावत असताना आरोग्य केंद्राची समस्या त्वरित निकाली काढल्यास गावातील सुशिक्षित वर्ग वेगळे हत्यार हातात घेतल्याशिवाय राहणार नाही असा इशारा गावकऱ्यांच्या वतीने देण्यात आलेला आहे.

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED