✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.25जून):-दाई जंगो रायताड गोंडीयन पेनठाना चिमूर येथे विरांगणा राणी दुर्गावती बलीदान दिवस साजरा करण्यात आला, यावेळी बहुसंख्येने समाज बांधव उपस्थित होते.

या समारोहात क्रांतिकारक इतिहासाचे अवलोकन करण्यात आले. गोंडवानातिल महान क्रांतीकारक विरागणा राणी दुर्गावती संग्रामशहाचा मुलगा दलपतशहा यांचेशि विवाह झाला. संग्रामहशाच्या मृत्यू नंतर दलपतशहा व राणि दर्गावती चांगले राज्य करु लागल्यामुळे त्यांचे दुश्मनही तेवढेच तयार झाले. दोघानाही जनता एक प्रकारे भगवान मानत होते. राणी दुर्गावती यांना एक पुत्ररत्न झाले, सात आठ वर्षें वैवाहिक जिवन चांगले चालले असताना दलपतशहाचा अकाली निधन झाले राणि दुर्गावती यांना धीर देणे दुरच राहिले परंतू सत्येच्या लालशेने शत्रुची नजर समृध्दशाली राज्यव्यवस्थेवर लागली. आपल्या तिन वर्षाच्या मुलाला उत्तराधिकारी बनवून मोठा होईपर्यंत कारभार पाहू लागली. पूर्वजांच्या रितीरीवाजा प्रमाणे राणी दुर्गावती राज्य करु लागली.

बाजबाहादूर सारख्या शक्तीशाली सुलतानास युध्दात हरविल्यामुळे राणि दुर्गावतीची किर्ती चोहीकडे परसली, सम्राट अकबराला या बाबत माहिती झाली तेव्हा तो फार चकित झाला ,अकबराने त्यावेळेस राणि दुर्गावतीच्या मुलाला वीरनारायणला सुध्दा राज्याचे शासक म्हणून स्वीकार केला.
गोंडवाना राज्यातील सफलता व समृध्दी अनेक राज्यानी व नवाबांनी पाहून त्यांना राणिचा तिरस्कार वाटू लागला. शेवटी कडा मनिपुरचा सुबेदार अब्दूल मजीद आसफ खाॅ आणि यानी शक्तीशाली सेना उभी केली, प्रथम मनात कुटनिता करुण राणिकडे दोस्तीचा हात पुढे केला राणि कडील गुप्त माहीती घेवून काही वेळानंतर राज्याला घेराव घातला .त्यानी हीच खरी वेळ पाहून राणि दुर्गावती वर आक्रमण केले. राणि बहादुर होती ती पण रणचंडीका बनून उतरली आणि अब्दुल मजीद आसफ खाॅ ची सेना पराभूत केली, इकडे राणि दुर्गावतीचे सैनिक विजयाच्या खुशीने मौज करीत होते. तिकडे शत्रूचे सैनिक याचा फायदा घेत होते. शत्रूने संपूर्ण किल्ल्याची बांधणी सुरू केली. सैनिक सुद्धा विजयामुळे असावधान होते. नंतर दोन्ही सैनिकांमध्ये भयंकर युद्ध झाले .

राणी दुर्गावतीचे दोन्ही मोठे सेनाधिकारी शम्य खाॅ मीयाना आणि मुबारक बिलूचने आपल्या सैनिकाच्या तुकडीने बहादूरीपूर्वक मोर्चा सांभाळला. वीर नारायण सुद्धा युद्धात उतरून वीरतेचा परिचय देऊ लागला. युवराज वीरनारायण युद्धात घायल झाला. सैनिकाची धावपळ सुरू झाली. व वीरनारायणला सुरक्षित ठिकाणी पाठवून राणी पुन्हा युद्धात उतरली, एवढ्या मोठ्या बलाढ्य सैनिका समोर राणीचे सैन्य अपुरे पडले होते. तरीपण त्या सैन्याचा प्रतिकार करत होते. तेवढ्यात अचानक एक तिर राणीच्या डाव्या कानपट्टी घुसला .रक्त वाहू लागले राणिने तो तिर बाहेर काढून फेकून दिला, परंतु तिराचा फाल मानेमध्ये फसून राहिल्यामुळे राणीला असह्य वेदना होऊ लागल्या. तेवढ्यात पुन्हा दुसरा तीर राणीच्या मानेत येऊन घुसला व भरमसाठ रक्त वाहू लागल्यामुळे राणी जागीच बेशुद्ध पडली. काही
वेळानंतर पुन्हा शुद्धीवर येताच शत्रुने राणीला घेरले होते.

हे लक्षात आल्यावर आपल्या महाबत आधार सिंह बघेला यांना म्हणाली “मेरा सर आपणी तलवार से काट दो. अन्यथा शत्रु के हातो से मारी जाऊंगी !” यावर आधार सिंह म्हणाला जिसका मय नमक खाया है उनके प्रति यह दृष्ट कृत्य करणे के लिये हात नही उठेंगे! मै आपका युद्ध के रणांगण से बहार निकाल सकता हू! परंतु राणीस रणांगणातून पळ काढणे एका विरांगणा ला शोभण्यासारखे नव्हते म्हणून राणीने शेवटी आपली तलवार काढून आपल्या गळ्यावर चालवून आत्मोत्सर्ग केला.तो दिवस २४जून १५६४ होता. जबलपूर मध्ये राणीची 420 पुण्यतिथी 24 जून 1964 मध्ये साजरी करण्यात आली. राणीला युद्धात अशाप्रकारे वीरगती प्राप्त झाली, म्हणून ही माहीती गोंडीयन समाजा पर्यंत पोहचावी म्हणून दाई जंगो रायताड गोंडीयन पेनठाना येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .

रवी वरखडे यांनी राणि दुर्गावती यांचे फोटोला माला अर्पण केले, प्रमुख पाहूने डॉ राजु मडावी व विलास कोयचाडे मार्गदर्शन केले व राणि दुर्गावतीचे कार्य घराघरात पोहोचले पाहीजे असे गौरवोद्गार काढलेप्रकाश कोडापे यांनी राणी दुर्गावती यांचे जिवणावरील कविता गायन केले.

कार्यक्रमाला रोहीत मडावी ,प्रीत कोडापे ,मोहीत कोडापे , होमराज सिडाम ,भारत कोडापे ,मारोती मसराम ,जिवन येरमे, देवदास धुर्वे, बेबी कोडापे, आशा खुशाल मडावी, अल्का मडावी व समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश कोडापे यांनी केले तर आभारप्रदर्शन रोहीत मडावी ने केले.

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED