

✒️पुणे(पुरोगामी संदेश नेटवर्क)
पुणे(दि.25जून):-दि.२४-पुणे- भविष्यात दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी व ग्रामीण भागातील विद्यार्थी वर्गाची समस्या ओळखुन जयहिंद काॅलेजची स्थापना शिक्षणमहर्षी कै.तात्यासाहेब गुंजाळ यांनी केली.
जयहिंद कॉलेज ऑफ इंजिनीरिंग कुरण ता.जुन्नर जि.पुणे येथे संगणक अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षात शिकत असणारी कु. मुळे दिव्या बुधाराम हिच्या आईचे कोरोना आजाराच्या साथीत दुःखद निधन झाले. वडिलांची परिस्थिती खूप गरीब आहे. त्यामुळे शैक्षणिक प्रगती थांबण्याची विपदा कुमारी. दिव्यावर ओढवली होती. परंतु जयहिंद शैक्षणिक संकुल कुरणचे जनसंपर्क अधिकारी व जयहिंद आय.टी.आयचे उपप्राचार्य प्राध्यापक. सुभाष आंद्रे सर यांना या मुलीच्या परिस्थितीविषयी माहिती समजतात. त्यांनी तिच्यासाठी आर्थिक मदत मिळविण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी अनेक सेवाभावी संस्थांना मदतीसाठी फोन केले.
हे फोन करत असताना त्यांना यापूर्वी अशाच एका गरीब विद्यार्थिनींना मदत केल्याची पोस्ट फेसबुक वर केल्याची आठवण झाली. दानशूर श्री कुंदन पवार यांची कतार देशातून त्यावेळेस ही पोस्ट वाचून श्री. कुंदन पवार हे मूळचे नारायणगाव (पारुंडे) चे रहिवासी परंतु सध्या ते परदेशात कतार या देशात नोकरी करत आहेत. त्यांनी या पद्धतीने त्यांनी कार्य केल्यामुळे त्यांचे कौतुक केले व ज्यांनी मदत दिली त्यांचे आभार मानले . येथून पुढे हुशार व होतकरू गरिब विद्यार्थ्याला अशी शिक्षणासाठी अडचण आली, तर आवर्जून सहकार्य सांगा असा शब्द दिला.
ज्यावेळेस या मुलीची आर्थिक परिस्थिती समजली. त्यावेळेस प्रा.सुभाष आंद्रे यांनी क्षणाचाही विचार न करता माननीय.श्री. कुंदन पवार साहेब यांना फोन करून सदर विद्यार्थिनीची परिस्थिती सांगितली व तिला खूप मदतीची गरज आहे. हे वाक्य उच्चारताच त्यांनी तिच्या नावे २५ हजार रुपये देऊ केले.
श्री कुंदन पवार साहेब नेहमीच आपल्या भारतीय गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीसाठी नेहमीच मदत करत असतात त्यांच्या दातृत्वातुन कुमारी. दिव्या आणि तिच्यासारख्या असंख्य गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना आशेचा किरण मिळालेला आहे. होतकरूं च्या जीवनात “शिक्षणातून आमुलाग्र कायापालट होतो “ , हया कोटीवर श्री. कुंदन पवार साहेबांचा विश्वास असून , त्यांचे प्रा.सुभाष आंद्रे व जयहिंद शैक्षणिक संकुलाच्या वतीने यावेळी सहकार्य करणा-यांचे आभार मानण्यात आले.