बरबडावाडी या गावच्या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी- सुनील ठोसर

24
✒️नायगांव प्रतिनिधी(शिवानंद पांचाळ नायगांवकर)संपर्क:-९९६०७४८६८२

नायगाव(दि.25जून):-तालुक्यातील बरबडावाडी या गावच्या जाणाऱ्या रस्त्याची कित्येक वर्षांपासून दयनीय अवस्था झाली असून रस्त्याच्या दुरवस्थेमुळे बरबडावाडी येथील नागरिकांना मरण यातना सोसण्याची वेळ आली आहे.अनेकवेळी लेखी निवेदनाद्वारे रस्ता दुरुस्तीसाठी मागणी केली आहे व निवेदनाच्या प्रती कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग जिल्हा परिषद नांदेड यांनादेखील दिले आहेत बरबडा वाडी येथील एखादा पेशंट आजारी असेल तर त्यांना दवाखान्यात नेण्यासाठी अत्यंत अडचणीचा सामना करावा लागत आहे.आजारी असलेल्या रुग्णांना दवाखान्यात नेण्याची वेळ रस्त्याच्या दुरवस्थेमुळे गावकऱ्यांवर आली आहे.

अशी वस्तुस्थिती बरबडावाडी पुनर्वसित गावात असून येथे पर्यायी मार्ग दुसरा उपलब्ध नसल्यामुळे बरबडावाडी येथील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार व गावकऱ्यांच्या दयनीय अवस्थेची दखल घेऊन रस्त्याची तात्काळ सुधारणा करण्यात यावी अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे नेते सुनील ठोसर यांच्या वतीने करण्यात येत आहे.