धनज येथे कोविड लसीकरण शिबिर संपन्न

37

✒️अमोल जोगदंडे (धनज प्रतिनिधी तालुका उमरखेड)मो:-8806583158

उमरखेड(दि.25जून):-तालुक्यातील धनज येथे सरपंच ,उपसरपंच, सचिव,तलाटी, ग्रा.पं.सदस्य यांच्या पुढाकारांने ग्रामपंचायत कार्यालय येथे दि.२३ जुन रोजी कोविड-१९ प्रतिबंधात्मक लसीकरण शिबीर घेण्यात आले.

कोविड प्रतिबंधात्मक लस प्राथमिक आरोग्य केंद्र मुळावा येथे मिळते परंतु गावापासून ते आरोग्य केंद्रापर्यंतचे अंतर दूर असल्यामुळे तसेच आरोग्य केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी त्यामुळे धनज येथे कोविड प्रतिबंधात्मक लस ही १८ वर्षावरील ७० नागरिकांना देण्यात आली.

यावेळी या लसीकरण शिबिराला सरपंच सौ.वनिता देवानंद पाचपुते, तलाठी जि.एस.मोळके ,उपसरपंच सौ .मुक्ता संजय झाटे ,ग्रामसेवक बि.डि.भांगे, पोलीस पाटील बापुराव धनवे ,ग्रा.पं.सदस्य प्रविण वाळले, दिलीप वाळके, आशाबाई दतप्रसाद जाधव ,गौतम ढोबळे,कानिफनाथ गुव्हाडे,रेश्मा चव्हाण, पिंटू व्यवहारे,माजी सरपंच महानंदा डोंगरे, प्रा.आरोग्य केंद्र मुळावा सेविका नांगनवार मँडम , आरोग्य सेवक मेंडके मदतनीस सरस्वती बोबंले ,पोफाळकर सर, अमोल जोगदंडे, बाळु कर्हाळे ,तातेराव भडंगे, नासेर देशमुख, वकील मजर देशमुख दतप्रसाद जाधव, साहेबराव राठोड ,देवानंद पाचपुते ,डिलर राजाराम वाळके, विष्णू चव्हाण ,साहेबराव वाळके, अनाजी बोबंले, चरण डोगंरे हे उपस्थित होते.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला पुन्हा तोंड द्यावे लागु शकते .यासाठी प्रत्येक गावातील प्रत्येकांने लस घेणे गरजेचे आहे. यासाठी दि.२१ जुनपासून लसीकरण सप्ताह राबविला जात आहे.

त्यात धनज मोहदरी,आडद येथे दिनांक २३जुन रोजी लसीकरणाला तहसीलदार आनंद देऊळगावकर साहेब यांनी भेट दिली.तसेच त्यांनी नागरिकांना आवाहन केले की नागरिकांनी कुठल्याही अफवेला बळी न पडता स्वयंप्रेरणेने लसीकरणासाठी समोर यावे इतरांना ही लसीकरण्यासाठी तयार करावे लस ही सुरक्षित आहे.