ओबीसी समाजाच्या संवैधानिक न्याय मागण्या पुर्ण करा

23

🔹राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या मार्फत निवेदन

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.25जून):-ओबीसींची जातनिहाय जनगणना करा, ओबीसींचे राजकीय व इतर क्षेत्रातील व जिल्ह्यातील आरक्षण पुर्ववत करा, अन्यथा सत्ता सोडा, ओबीसींची जातनिहाय जनगणना जो करेल ओबीसी समाज त्याच्या सोबत, ओबीसींचे आरक्षण अबाधित ठेवा, नवे पर्व ओबीसी सर्व असा एल्गार करीत राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने ब्रम्हपुरी येथे उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या मार्फतीने निवेदन सादर करण्यात आले.

ओबीसी समाजाची २०२१ मधे होऊ घातलेली जातनिहाय जनगणना केंद्र सरकार करत नसेल तर महाराष्ट्र शासनाने राज्यात ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी, आयोगाची नियुक्तीओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नती मध्ये आरक्षण दया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, नंदुरबार, धुळे, ठाणे, नाशिक, रायगड व पालघर अशा आठ जिल्ह्यातील कमी झालेले आरक्षण पुर्ववत करा, ऑल इंडिया मेडिकल कोटा मध्ये ओबीसींच्या कमी झालेल्या जागा पुर्ववत करा, ओबीसींचा बॅकलॉक त्वरित भरा, आधी जातनिहाय जनगणना करा व मगच रोहिणी आयोग लागु करा, व राज्यसरकारने मेगा नोकर भरती त्वरीत करावी, राज्य शासनाने एमपीएससी व इतर स्पर्धा परीक्षा त्वरीत घ्याव्या, आदी अनेक मागण्यांवर आंदोलन करुन केंद्र व राज्य सरकारांना निवेदन देण्यात आले.

यावेळी निवेदन देतांना राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे तालुका अध्यक्ष रवी पिलारे, सरचिटणीस टिकेश्वर शिवणकर, दिलीप बावणकर , नामदेव गहाणे, अँड गोविंदराव भेंडारकर , मनोज वझाडे , केवळ मैंद , रामकृष्ण चौधरी , विजय शास्त्रकार , शरद दर्वे , अरविंद राऊत , राजेंद्र ठाकरे , गंगाधर पिलारे , पंढरी पिसे , प्रेमचंद अवसरे , रतिराम निकुरे , रामेश्वर सेलोटे ,किरमीरे सर ,मेश्राम सर , टोंगे सर , गुरुदेव माकडे , नदेश्वर साहेब उपस्थित होते.तर ओबीसी युवा संघटनेचे राहुल मैंद, गोवर्धन दोनाडकर, देवनंदन ठेंगरी, वैभव तलमले, स्वप्नील राऊत, लक्ष्मण मेश्राम, तेजस गायधने, अरविंद नागोसे चेतन चीचमलकर, मयुर चीचमलकर सूरज मदनकर व इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.