तहसीलदारांच्या गोदापात्रात धाडीत दोन हायवा, दोन ट्रॅक्टर, जेसीबीसह सात ब्रास वाळू जप्त

    43

    ✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)

    गेवराई(दि.25जून):–गोदा नदीपात्रात अनाधिकृत वाळुचा उपसा सुरुच आहे. आज पहाटे तहसीलदार सचिन खाडे यांनी तीन ठिकाणी धाडी टाकून दोन हायवा, दोन ट्रॅक्टर, एक जेसीबी व सात ब्रास वाळू जप्त केली. या धाडसत्राने वाळु माफियात एकच खळबळ उडाली. अन्य काही ठिकाणीही अनाधिकृतपणे वाळु उपसली जात असून त्या ठिकाणीही धाड टाकण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. जप्त केलेली वाहने तलवाडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. गोदावरी नदीच्या पात्रातून अनाधिकृतपणे वाळुचा उपसा सुरुच आहे. वाळु माफियांवर कठोर कारवाई होत नसल्याने वाळु माफिया जेसीबीद्वारे रात्रंदिवस वाळु उपसा करून सदरील वाळु चढ्या भावाने विक्री करतात.

    आज पहाटपासून तहसीलदार सचिन खाडे यांनी गोदापात्रात धाडी टाकण्यास सुरुवात केली. सकाळी सहा वाजता राक्षसभुवन शिवारात धाड टाकून या ठिकाणी एक हायवा, एक जेसीबी आढळून आला तसेच राजापूर फाटा शिवारातून एक हायवा आणि तफे निमगाव शिवारात दोन ट्रॅक्टरसह सात ब्रास वाळू जप्त करण्यात आली. अन्य ठिकाणीही हे पथक धाडी टाकणार असल्याचे सांगण्यात आले. दुपारपर्यंत हे धाडसत्र सुरू होते. या धाडसत्राने वाळु माफियात एकच खळबळ उडाली. ही कारवाई तहसीलदार सचीन खाडे, लेंडाळ, पखाले, देशमुख, डोपे, ठाकूर यांनी केली. जप्त केलेली वाहने तलवाडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आली.