थकबाकीदार वीज ग्राहकांची वीज तोडनी त्वरित थांबून तोडलेले वीज कनेक्शन पुन्हा जोडा

26

🔹वंचित बहुजन आघाडीची विज वितरण कार्यालयावर धडक

✒️सिध्दार्थ दिवेकर(तालुका,प्रतिनिधी उमरखेड)

उमरखेड(दि.25जून):- तालुक्यात गेल्या काही दिवसापासून महावितरणने ढाणकी व परिसरात थकबाकीदार वीज ग्राहकांची वीज तोडणी मोहीम हाती घेतली आहेयात विज बिल न भरणाऱ्या अनेक ग्राहकाचे वीज कनेक्शन कापून वीज तोडणी केली, वंचित बहुजन आघाडी ने या विषयी आक्रमक पवित्रा घेत उप कार्यकारी अभियंता कार्यालयावर धडक देऊन वीज तोडणी मोहीम त्वरित थांबवून तोडलेली वीज कनेक्शन पुन्हा जोडा अशी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

आधीच कोरोना महामारी च्या काळात लोक डाऊन दरम्यान हाताला काम नसल्याने उद्योग धंदे बंद असल्याने आर्थिक विवंचनेत सापडलेल्या सामान्य नागरिक शेतकरी व्यापारी यांच्या पुढे महावितरण ने विज तोडणी मोहीम हाती घेतल्याने एक नवं संकट उभे केले आहे.

कोरोना महामारी च्या काळात हजारो तरुणांच्या हाताची कामे गेली, किरकोळ व सामान्य व्यापार्‍यांचे दुकाने ही बंद होती , मजूर वर्ग आणि शेतकरीही घरातच होता, यामुळे मोठा आर्थिक त्रास यावर का सहन करावा लागला.कोरोणा महामारीतून त् सावरण्याचा कसाबसा प्रयत्न बळीराजा करीत असताना आता पावसाने दांडी मारल्याने त्यांच्या समोर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे.शेतात मजुरांना काम नसल्याने मजूर परेशान, पावसाने दांडी मारल्याने शेतकरी परेशान, आणि ग्राहक नसल्यामुळे व्यापारी परेशान आहेत, गोर गरीब मजुरांच्या दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे, एकंदरीत सर्व जनतेला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे, अशा गंभीर परिस्थितीमध्ये शेतकरी व्यापारी शेतमजूर गोरगरीब जनतेचे वीज कनेक्शन कापून त्यांना वीज बिल भरण्यासाठी तगादा लावण्याचे काम महावितरण करीत आहे.

या मुळे सर्वसामान्य जनतेला पोट भरावं की वीज बिल भरावं असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे,या विषयी महाराष्ट्र राज्याचे ऊर्जामंत्री माननीय नितीन राऊत साहेब यांनी लक्ष घालून आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, सामान्य जनता, यांना वीज बिल भरणा करण्यासाठी आणखी काही महिने मुभा द्यावी, सध्या सुरू असलेली वीज तोडणी मोहीम त्वरित थांबून, तोडलेली वीज कनेक्शन पुन्हा जोडून सामान्य जनतेला दिलासा द्यावा,या मागणीचे निवेदन वंचीत बहुजन आघाडी ने उपकार्यकारी अभियंता , यांचे मार्फत महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे केली आहे,
वरील मागण्या त्वरित मान्य मोठे जनआंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनातून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव प्रशांत तथा जॉन्टी विणकरे, नगरसेवक तथा माजी सभापती संबोधी गायकवाड,रमेश कदम, समाधान राऊत, सुनील राऊत, गोलू मुणेश्र्वर, पप्पू गायकवाड, भाउ पाईकराव, अजय हाडसे, अजय कदम, अक्षय कांबळे, ऋतिक गायकवाड, जय कानिंदे यांनी दिला आहे.