🔹ओबीसी समाजाची जगगणना तात्काळ करा

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.25जून):-भाजपाच्या वतीने माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यात ओबींसीचे आरक्षाणाच्या बचावासाठी चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असुन,ओबीसी समाजाची जणगणना तात्काळ करून ओबीसीवर कायम अन्याय होत असुन ओबीसी समाजाला न्याय मिळण्यासाठी धामणगांव येथे होणा-या चक्का जाम अंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे अहवान मा.आ.भीमसेन धोंडे यांनी केले आहे.

       आष्टी येथील पंडीत जवाहर नेहरू महाविद्यालयात आज शुक्रवार दि.२५ रोजी सांयकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आलेल्या पञकार परिषदेत मा.आ.भीमसेन धोंडे बोलत होते.पुढे बोलतांना ते म्हणाले,संपूर्ण महाराष्ट्रभर ओबीसी आरक्षणा संदर्भात भाजपाच्या वतीने माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात चक्काजाम अंदोलन करण्यात येणार आहे.तर आष्टीचे आंदोलन आम्ही बीड – नगर मार्गावरील धामणगांव येथे चक्काजाम आंदोलन सकाळी अकरा वाजता करणार आहोत.सध्या प्रत्येक समाजाचे आरक्षणाचे वारे पेटले असून प्रत्येक समाजाच्या आरक्षणासह इतरही मागण्या आहेत.

तसेच मराठा,ओबीसी,मुस्लीम, ब्राम्हण व धनगर या पाच प्रमुख जातींच्या आरक्षणाचे प्रश्न आहेत.येणा-या काळात निवडणूका होणार असून या निवडणूकीत ओबीसींच्या आरक्षणाशिवाय होणार असून हा ख-या अर्थाने ओबीसी समाजावर अन्याय झाला असल्याचेही त्यांनी सांगीतले.तसेच ओबीसी समाजात सध्या ३५२ जातींचा समावेश असून,अजूनही या ओबीसीमध्ये इतर जातींचा समावेश होणार आहे.तरी सध्या शासनाने ओबीसीची जनगणना करण्याची प्रमुख मागणीही त्यांनी यावेळी पञकार परीषदेत सांगितली.

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED