महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे सामाजिक न्याय दिन उत्साहात साजरा

31

✒️धरणगाव(पुरोगामी संदेश नेटवर्क)

धरणगाव(दि.26जून):-स्थानीय महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे सामाजिक न्याय दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भारतातील थोर समाज सुधारक – आरक्षणाचे जनक – कल्याणकारी राजा कोल्हापूर संस्थानचे राजे राजर्षी शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी करण्यात आली.छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी आरक्षण दिले आणि बहुजन समाजाला शिक्षण – समता – स्वातंत्र्य – बंधुता – न्याय देण्याचे काम केले.

बहुजनांना शिक्षण देऊन गुलामगिरीतून मुक्त केले.
सर्वप्रथम शाळेचे पर्यवेक्षक जे.एस.पवार यांच्या शुभहस्ते मोठ्या दिलाचा राजा – आरक्षणाचे जनक – राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.याप्रसंगी शाळेतील शिक्षक हेमंत माळी , व्ही.टी. माळी , एस.एन.कोळी , सी.एम.भोळे, एस. व्ही. आढावे, पी.डी.पाटील, श्रीमती. व्ही.पी.वऱ्हाडे, श्रीमती. एम.जे.महाजन, नूतन प्राथमिक विद्यामंदिर चे मुख्याध्यापक अतुल सूर्यवंशी, जे.एस. महाजन,अशोक पाटील, प्रदिप पवार उपस्थित होते.