नागभीड येथे मिसाबंदींचा सत्कार

24

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

नागभीड(दि.26जून):-२५ जुन १९७५ ला याच दिवशी देशात आणीबाणी लागु करण्यात आली . तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हुकुमशाही प्रवृत्तीने जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा एकप्रकारे खुनच करण्यात आला . या आणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्या व हालअपेष्टा सहन केलेल्या नागभीड तालुक्यातील ६ मिसाबंदींचा सत्कार जिल्हा भाजपाच्या वतीने सन्मानचिन्ह , प्रमाणपत्र , शाल , वाफारायंत्र , फेसशिल्ड , मास्क व सॅनिटायजर देउन करण्यात आला .

याप्रसंगी आणीदरम्यानच्या आठवणींना उजाळा देत मिसाबंदी भावनाविवश झाले होते . यात भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष श्री मोरेश्वरजी ठिकरे , ज्येष्ठ नेते मन्सारामजी बोरकर यांचा समावेश होता. यावेळी भाजपा जिल्हा संघटन महामंत्री व जि. प. सदस्य संजय गजपुरे , नागभीड तालुका भाजपा अध्यक्ष संतोष रडके , तालुका महामंत्री जगदिश सडमाके , रमेश पाटील बोरकर , संजय गहाणे, प्रकाश कुमरे , सचिन चिलबुले व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती .