ओबीसींच्या आरक्षणासाठी दोन्ही राष्ट्रीय पक्ष मैदानात

27

🔸भाजपाचे संजय गांधी चौकात चक्काजाम आंदोलन तर काँग्रेस चे गांधी चौकात धरणे आंदोलन

✒️सिध्दार्थ दिवेकर(तालुका प्रतिनिधी उमरखेड)

उमरखेड(दि.26जून) :- सध्या राज्यात आणि देशात गाजत असलेला मुद्दा म्हणजे ओबीसीचे रद्द झालेले राजकीय आरक्षण. आरक्षण रद्द झाल्यामुळे राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी आणि राज्यात विरोधी पक्ष असलेला भाजपा हे एकमेकां वर आरक्षण रद्द झाल्याचे खापर फोडतांनी दिसत आहे.याचाच एक भाग म्हणून उमरखेड शहरात दोन प्रमुख राष्ट्रीय पक्ष भाजपा आणि काँग्रेस यांच्या वेगवेगळ्या आंदोलनामुळे उमरखेड शहर दणाणून गेले होते.

आमदार ससाणे यांच्या नेतृत्वात भाजपाचा चक्का जाम

ओबीसी चे राजकीय आरक्षण रद्द केल्याचा कारणामुळे आघाडी सरकारच्या निषेधार्थ उमरखेड येथील गायत्री चौकात आमदार नामदेव ससाणे यांच्या नेतृत्वात चक्का जाम आंदोलन करण्यात आले.

स्थानिक स्वराज्य संस्था मधील आरक्षण रद्द केल्यामुळे राज्यातील सर्व जिल्हा परिषदा, पंचायत समित्या मधील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील ओबीसी आरक्षण रद्द केल्यामुळे राज्य सरकार चा निषेध करण्यात आला.यावेळी महाविकास आघाडी विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी आमदार नामदेव ससाणे, शिक्षण सभापती प्रकाश दुधेवार,बळवंतराव नाईक, अजय बेदरकर , शिवाजी माने, दिलीप सुरते, आनंदराव चिकणे, अलका ताई मुडे,अतुल खंदारे, बबलू मैड, ढाणकी नगराध्यक्ष सुरेशलाला जयस्वाल, दत्त दिगांबर वानखेडे,रोहित वर्मा, महेश पिंपरवार, संतोष तिरमकदार, बाळू योगोवार, पुंडलिक कुबडे, पुंडलिक कुबडे, देवा इंगोले, श्रीकांत देशमुख, सुनील मांजरे,योगेश ठाकूर, दिनेश आत्राम, सूत्रसंचालन प्रा. विशाल गिरी यांनी केले.

माजी आमदार विजयराव खडसे यांच्या नेतृत्वात काँग्रेस चे धरणे आंदोलन

ओबीसींचे रद्द झालेले राजकीय आरक्षण हे केंद्र सरकार च्या हलगर्जी पणामुळेच रद्द झालेले असून केंद्र शासनच याला जबाबदार आहे. त्यामुळे केंद्र शासनाने ओबीसीचे राजकीय आरक्षण परत मिळून द्यावे यासाठी काँग्रेसने गांधी चौकात धरणे आंदोलन केले . यावेळी माजी आमदार विजयराव खडसे, बांधकाम सभापती राम देवसरकर, तातू देशमुख, नंदकिशोर अग्रवाल, गोपाल अग्रवाल, बाळासाहेब चंद्रे पाटील, बाबू हिनावाले, भारती महाराज, सोनू खतीब, बबलू जाधव आदी उपस्थित होते.