ओबीसींच्या समर्थनार्थ भाजपाने केला ‘रास्ता रोको’

    35

    ?आमदार कुणावार,आमदार आंबटकरांसह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

    ✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)

    हिंगणघाट(दि.२६जून):-ओबीसींच्या न्याय्य मागण्या सरकारने मान्य कराव्या या मागणीसाठी समुद्रपुर तालुक्यातील जाम येथे भाजपाचे विधानसभा क्षेत्राचे आमदार समिरभाऊ कुणावार,विधानपरिषद सदस्य डॉ.रामदासजी आंबटकर यांचे नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारचा जोरदार निषेध करीत ओबीसींना न्याय देण्याची मागणी केली.सकाळी १०.३० वाजताचे दरम्यान शेकडो पक्षकार्यकर्ते आंदोलनस्थळी उपस्थित होत तब्बल २ तास राष्ट्रीय महामार्गावरची वाहतुक रोखुन धरली होती.

    यावेळी आ.समिर कुणावार,आ.रामदास आंबटकर यांचेसह जिल्हा भाजपा महामंत्री किशोर भाऊ दिघे, माजी जि. प. अध्यक्ष नितीन भाऊ मडावी, आरोग्य व शिक्षण सभापती जिल्हा परिषद मृणाल माटे, समुद्रपुर पं.स.सभापती सौ सुरेखाताई टिपले,हिंगणघाट पंचायत समिती सभापती शारदाताई आंबटकर,माजी जि.प.सदस्य वसंतरावजी आंबटकर,तालुका अध्यक्ष संजय डेहणे, आकाश पोहाणे, अध्यक्ष आशिष पर्बत,समुद्रपूर नगराध्यक्ष गजुभाऊ राऊत, हिंगणघाट नगराध्यक्ष प्रेम बसंतनी भाजयुमोचे प्रदेश सरचिटणीस अंकुश भाऊ ठाकूर,उपसभापती योगेश भाऊ फुसे, तुषार आंबटकर,कैलास जी टिपले सुनील डोंगरे,बिस्मिल्ला खान अनिल गहरवार, वामनराव चंदनखेडे,कवीश्वर इंगोले, रोशन पांगुळ,चंदू भाऊ माळवे, विनोद भाऊ विटाळे, सरपंच नितीन वाघ इत्यादिसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.