विवाहितेला विषारी औषध पाजून खून

36

🔺गेवराई शहरातील सिध्दीविनायक नगर येथील घटना

✒️प्रतिनिधी गेवराई(नवनाथ आडे)

गेवराई(दि.26जून):- गेवराई शहरातील सिध्दीविनायक नगर मधील एका विवाहीत महिलेला नवरा, सासू, सासरा, दिरानी मिळून शारिरीक व मानसिक छळ करून तिला बळजबरीने विष पाजून खून केल्याचा नातेवाईकांनी आरोप केला असून दरम्यान, सासरच्या लोकांविरोधात खूनाचा गुन्हा नोंद करण्यात यावा, अशी मागणी करून महिलेच्या नातेवाईकांनी गेवराई पोलीस ठाण्यासमोर मुलीचा मृतदेह ठेवून ठिय्या दिला. मयत कांचन विशाल राठोड वय २६ औरंगाबाद येथे उपचार सुरू होते परंतु उपचारा दरम्यान दुदैवी मृत्यू झाला.उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. विशेष बाब म्हणजे, महिलेचा मृत्यू होताच नवरा व अन्य लोकांनी घटनास्थळावरून पळ काढल्याने महिलेच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला.

कांचन (कविता) विशाल राठोड, ( वय, 26 ) रा. सिद्धीविनायक नगर मध्ये तिच्या सासरी राहत होती. कोणत्या तरी कारणावरून सासरचे लोक तिचा मानसिक, शारीरिक त्रास देऊन छळ करीत होते.10 जून रोजी तिला बळजबरीने नवरा, सासू, सासरे आणि दिराने मिळून तिला विष पाजले असल्याचा आरोप नातेवाईकांकडून केला जात आहे. गेवराई पोलीस स्टेशन मध्ये मुत्यदेह सह वडील व नातेवाईक आहेत गुन्हा दाखल केल्याशिवाय अंतिम संस्कार करणार नाही असा ठिय्या मांडून बसलेले दिसत आहे