

✒️विशेष प्रतिनिधी(संजय कोळी)
दोंडाईचा(दि.26जून):- आरक्षणाचे उद्गाते राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पक्ष दोंडाईचा शहरातर्फे ओबीसी आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ धुळे रोड राऊळनगर चौफुलीवर चक्का जाम आंदोलन भाजपा शहराध्यक्ष प्रविण महाजन , उपनगराध्यक्ष नबु पिंजारी ,माजी उपनगराध्यक्ष रविंद्र उपाध्ये यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले .प्रविण महाजन यांनी सांगितले की देशात सर्वप्रथम आरक्षणाची संकल्पना माडुंन अस्तित्वात आणणारे राजर्षी शाहू महाराज व त्या आरक्षणाची सखोल मिमांसा करुन कायद्यात रुपांतरीत करणारे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मागासवर्गीय समाजाला शिक्षण ,नोकरी व राजकीय प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाची तरतूद भारतीय राज्यघटनेत केली परंतु महाराष्ट्रातील महाविकास आघाडी घटनेची पायमल्ली करुन ओबीसी समाजावर अन्याय करीत आहे.
अशा अन्यायकारी सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही जोपर्यंत ओबीसींचे आरक्षण पुर्ववत होत नाही तोवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नये अन्यथा राज्यातील तमाम ओबीसींवर अन्याय राज्याचे मुख्यमंत्री मा.उद्वव ठाकरे सरकारकडुन होईल असे प्रतिपादन शहराध्यक्ष प्रविण महाजन यांनीकेले.याप्रसंगी कृष्णा नगराळे , रविंद्र उपाध्ये, जितेंद्र गिरासे ,पंकज चौधरी इ मान्यवरांनी ओबीसींवरील अन्याय दुर करण्याचे आवाहन केले .
आंदोलन यशस्वी करण्यासाठी भाजपा दोंडाईचा शहराचे संजय तावडे ,भरतरी ठाकुर , जितेंद्र गिरासे ,पंकज चौधरी ,प्रदीप कांगणे ,राजुबाबा धनगर , श्रीकांत सराफ ,सुफीयान तडवी ,कैलास दिक्षीत ,योगेश ठाकुर ,रामकृष्ण बडगुजर , कृष्णकांत घोडके ,भुषण अहिरे , अनिल सिसोदिया , अशोक चौधरी ,बापु तमखाने ,सुनिल शिंदे ,अनिकेत आव्हाड ,रफीक शाह , चंद्रसिंग राजपुत ,शुभम राजपुत , शशीकांत शिंदे , नरेंद्र बावीस्कर ,ईश्वर गिरासे ,पंकज बोरसे ,संजोग रामोळे ,सागर गिरासे ,दिलीप जाधव ,ईस्माईल पिंजारी ,मनोज थोरात , चंद्रकला सिसोदिया ,दिपक भिल ,भगवान बडगुजर ,नाना पाटील , जयवंत धनगर ,फिरोज पठाण इ पदाधिकारी उपस्थित होते.
आंदोलन स्थळी महामार्गाच्या दुतर्फा वाहनांची मोठी लाईन लागल्यामुळे काहीकाळ वाहतुक व्यवस्था विस्कळीत झाली होती अशा स्थितीत देखील दवाखान्यात तातडीने जाणारे वाहनांना आंदोलनातील पदाधिकाऱ्यांनी रस्ता करुन माणुसकीचे दर्शन दाखवीले . शातंता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी , सहायक पोलिस निरीक्षक गायकवाड इ मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी उपस्थित होते.