आरक्षण हक्क कृती समितीची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

24

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.26जून):-मागासवर्गीय अधिकारी कर्मचाऱ्यांना नोकरीतील पदोन्नती मधील आरक्षण पूर्ववत करण्यासह इतर मागण्यांसाठी 26 जूनला 80 विविध संघटना मिळून तयार झालेल्या आरक्षण हक्क कृती समिती , जिल्हा चंद्रपुर तर्फे प्रचंड आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चाची सुरूवात डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व आरक्षनाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दुपारी 12.30 करण्यात आली .या आक्रोश जनआंदोलनाचे नेतृत्व बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन आफ इंडिया, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष तथा आरक्षण हक्क कृती समितीचे राज्य निमंत्रणराजकुमार जवादे यांनी केले .

हा मोर्चा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून जयंत टॉकीज चौक, छोटा बाजार चौक, जाटपुरा गेट ,प्रियदर्शनी चौक, बसस्थानक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला, या मार्गात महात्मा ज्योतिबा फुले, राजे विश्वेश्वर महाराज, ब्यारिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या पुतळ्याना मोर्चेकऱ्यातर्फे अभिवादन करण्यात आले .मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचताच आपल्या मागन्यांचे निवेदन राजकुमार जवादे,आरक्षण हक्क कृती समितीचे राज्य प्रतिनिधी सुभाष मेश्राम, ऍड. रवींद्र मोटघरे, अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रविण खोब्रागडे, कास्ट्राइब कर्मचारी कल्याण महासंघाच्या विभागीय अध्यक्षा कविता मडावी यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, राज्यपाल यांना देण्यात आले.

या आक्रोश मोर्चात बहुजन वंचीत आघाडीचे विदर्भ संघटक राजू झोडे,बहुजन वंचीत आघाडीचे जिल्हा सचिव जयदीप खोब्रागडे, आलं इंडिया आदिवासी एम्प्लाईज फेडरेशनचे शांताराम उईके, धनगर समाज संघटनेचे जिल्हाअध्यक्ष प्रवीण बुचे,आयबीसेफचे एस डी सातकर,गोंडवाना सामाजिक कल्याण संस्थेचे जे एस गावडे, रिपब्लिकन स्टुडन्ट फेडरेशनचे राजस खोब्रागडे,गोंडवाना विद्यार्थी संघटनेचे सारंग कुमरे,आरोग्य कर्मचारी कल्याण महासंघाचे प्रकाश वाघमारे, महाराष्ट्र राज्य कास्टराइब कर्मचारी कल्याण महासंघाचे देव नगराळे, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे शालीक माऊलीकर , समता सैनिक दलाचे अशोक टेम्भरे ,रिपब्लिकन चळवळीतील कार्यकर्ते अंकुश वाघमारे, सत्यशोधक समाज, विदर्भ प्रदेश अध्यक्ष प्रा माधव गुरनुले, ओबीसी फेडरेशन व सेल्फ रिसपेक्ट मूव्हमेंटचे बळीराज धोटे, रिपब्लिकन पार्टी आफ इंडियाचे राजू भगत, ब्रह्मपुरी नगर परिषदेचे नगरसेवक अशोक रामटेके, वरोरा येथील संजय बोधे, जिवती येथिल प्रा जगदीश गांजरे, मूल येथील भडके सर,सिंदेवाहीचे प्रेमकुमार खोब्रागडे, नागभीडचे राजगडकर, गडचांदूर येथिल उमाजी कोडापे ,विमुक्त व भटक्या जमाती संघटनेचे आनन्द अंगलवार इत्यादी सह सम्पूर्ण जिल्ह्यातील सर्व प्रमुख संघटनाचे पदाधिकारी उपस्थित केला