कोविड-19 मुळे मृत्यु झालेल्या चर्मकार बांधवांच्या वारसांनी संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ योजनेचा लाभ घ्यावा – तुळशीराम वाघमारे

25

✒️तलवाडा प्रतिनिधी(शेख आतिख)

तलवाडा(दि.26जुन):-कोविड -19 (कोरोना) मुळे ज्या चर्मकार समाज बांधवांचा कुटूंब प्रमुख गमवावा लागला अशा कुटुंबातील वारसांना शासन स्तरावरून मदत मिळावी या हेतूने
महाराष्ट्र शासन अंगीकृत लिडकॉम् महामंडळातर्फे 16 जून 2021 रोजी एक जीआर काढण्यात आला असून पाच लाखा पर्यंत ची मदत मिळणार आहे. या योजनेचा लाभ कोविड ने मरण पावलेल्या कुटूंब प्रमुखांच्या वारसांनी घ्यावा असे आवाहन संत रविदास प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य चे संस्थापक तथा पत्रकार तुळशीराम वाघमारे,प्रभारी अध्यक्ष आप्पा सोनटक्के, महिला प्रदेशाध्यक्ष सुनीताताई नेटके, प्रदेशाध्यक्ष,दुद्धेश्वर पांडव सर, बाळासाहेब राऊत,यांनी केले आहे.

कोरोना रोगामुळे ज्या कुटुंबीयांचा कमवता कुटुंबप्रमुख ज्यांचे वय 18 ते 60 दरम्यान आहे असे कुटुंबप्रमुख मृत्युमुखी पडला असेल अशा कुटुंबाला एन एफ डी सी मार्फत व्यवसाया साठी पाच लाखाची ( 5 लक्ष ) कर्ज / मदत मिळणार आहे. त्यातील रु.४ लाख ६% व्याजदराने व रु. १ लाख अनुदान म्हणून असणार आहे. याबाबत शासनाने अध्यादेश जारी केला असून लवकरात लवकर अशा कुटूंबियांना संत रविदास प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य च्या पदाधिकारी यांच्या वतीने या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी पर्यंत करणार असून ज्यांचे कुटूंब प्रमुख या महामारीत गमावले आहेत.

अशा कुटुंबातील वारसांनी शासनाच्या जाहीर केलेल्या लिंक वर मयत व्यक्तीचे पूर्ण नाव- पत्ता , आधार कार्ड झेरॉक्स , स्त्री अथवा पुरुष , जात प्रमाणपत्र ,मृत्यू प्रमाणपत्र ,रेशनकार्ड झेरॉक्स, कुटूंब प्रमाणपत्र ( कुटूंबातील एकूण व्यक्तीची संख्या )
वारस प्रमाणपत्र,वार्षिक उत्पन्न ( 3 लाखाच्या आत )संत रविदास महाराज चर्मोद्योग चर्मकार विकास महामंडळ( लिडकॉम्) जिल्हा कार्यालय ,,,प्रत्येक जिल्ह्यातील बांधवानी आप-आपल्या जिल्हा महामंडळाच्या कार्यालयात माहिती सादर करावी.असे आवाहन संत रविदास प्रतिष्ठान चे संस्थापक तथा पत्रकार तुळशीराम वाघमारे,अध्यक्ष आप्पा सोनटक्के, महिला प्रदेशअध्यक्ष सुनीताताई नेटके,दुद्धेश्वर पांडव सर, संध्याताई सोनवणे,शारदाताई वाघमारे,श्रावण खांडेकर,बाळासाहेब राऊत,जितेंद्र खरात,राहुल डोंगरे,प्रशांत उनवणे,प्रभू उनवणे,यांच्या सह पदाधिकारी यांनी केले.

असून खालील नंबर वर संपर्क करावा 9623710777 / 9850491558 / 9921109187
काही अडचण आल्यास लिडकॉम शी संपर्क करावा लिडकॉम दूरध्वनी क्र. 02222044186, 02222047157 असेही आवाहन करण्यात आले आहे.