अध्यात्म व शिक्षण यांची सांगड घालणारे श्री.अक्कलवाड एन के सर यांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने…………..!

21

“जवाहरलाल नेहरु विद्यालय बरबडा ता नायगाव जि नांदेड येथील उपमुख्याध्यापक श्री. अक्कलवाड एन के सर हे आपल्या प्रदीर्घ अध्यापन सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत त्यानिमित्त त्यांची ओळख करून देणारा हा लेख प्रकाशित करीत आहोत- पुरोगामी संदेश नेटवर्क”

श्री. नारायण काळबाजी अक्कलवाड सर 1986 ते 1989 पर्यंत जनता अध्यापक विद्यालय उमरदरी ता मुखेड येथे मराठी चे प्राध्यापक म्हणून अध्यापन करीत होते त्यानंतर यांनी 1989 मध्ये जवाहरलाल नेहरु विद्यालयामध्ये सहशिक्षक म्हणून ज्ञानदानाचे पवित्र कार्य करण्यास सुरुवात केली. तेव्हा सरांनी पाटी आणि पोळी हा पाठ आम्हाला शिकवला तो आजही आम्हाला आठवतो सरांनी अध्यापनाचे कार्य करत असताना त्याना तत्कालीन मुख्याध्यापक श्री डांगे सर, सुरेवाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक क्षेत्रात झेप घेतली. साक्षरता अभियान, कुटुंब कल्याण, स्काऊट गाईड या सर्व क्षेत्रांमध्ये सक्रिय सहभाग घेतला तसेच दैनिक लोकमत चे प्रतिनिधी म्हणून वृत्त संकलनाचे कार्य केले.त्या काळात धर्माधिकारी यांचा नवरात्र महोत्सव प्रसिद्ध होता. या नवरात्र महोत्सवामध्ये कै. हभप दिगंबररावजी धर्माधिकारी यांच्या मार्गदशनाखाली कीर्तन व प्रवचनाचे कार्यक्रम होत असत यामध्ये नांदेड जिल्ह्याचे मामा अर्थात कै. गोविंदरावजी धर्माधिकारी साहेब यांच्या प्रेरणेने हा नवरात्र महोत्सव अपूर्व होत असे. या नवरात्र मध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण हभप किशन महाराज बरबडेकर करत असत.पारायनाबरोबर अस्खलित प्रवचन अक्कलवाड सर करीत असत.

सरांनी अनेक विद्यार्थी घडवले आहेत.सरांनी एकमेकां साहाय्य करु /अवघे धरू सुंपथ // या वचनाप्रमाणे अनेक गरीब होतकरु विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला. सरांची अध्यापनाची पद्धत सहज व सोपी असल्यामुळे ते विध्यार्थीप्रिय होते.
अक्कलवाड सरांचा जन्म नांदेड जिल्ह्यातील गोदावरी नदीच्या तीरावर असणाच्या भोकर (उमरी) तालुक्यातील इळेगावं (गं प) या दुर्गम खेड्यामध्ये 12 जून 1963 रोजी अत्यंत गरीब कुटुंबामध्ये झाला. त्यांचे 1 ली ते 4 थी पर्यंत चे शिक्षण गावातील जि प प्रा शाळेत झाले तर इयत्ता 5 वी ते 7 वी पर्यन्त चे शिक्षण जि प प्रा शाळा हांगीरगा येथे तर माध्यमिक शिक्षण नूतन विद्यालय उमरी येथे पूर्ण केले. भाऊसाहेब चिंचनसुरे यांनी 11 व्या वर्गासाठी जि प ज्युनिअर कॉलेज घुंगराळा येथे प्रवेश दिला.परंतु दुर्दैवाने 1979 मध्ये हे ज्युनिअर कॉलेज विध्यार्थीसंख्या कमी असल्यामुळे शासनाने बंद केले त्यामुळे इयत्ता 12 वी ला हुतात्मा पानसरे महाविद्यालय अर्जापुर ता बिलोली येथे प्रवेश घेतला.त्या काळामध्ये तेथे 12 वी चे परीक्षा केंद नसल्यामुळे लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय धर्माबाद येथे 12 वी ची परीक्षा द्यावी लागली.

पदवी पर्यंत चे शिक्षण पानसरे महाविद्यालयाचे प्राचार्य गोविंदराव गोपछडे सर यांच्यामुळे मोफत वसतिगृहामध्ये राहून पूर्ण केले गोपछडे सरांनी स्वतःच्या मुलाप्रमाणे माया लावली व सर्वच प्रकारची मदत केली म्हणून पदवी पर्यंत चे शिक्षण पूर्ण होऊ शकले.सरांनी एम ए मराठी पीपल्स महाविद्यालय नांदेड येथून पूर्ण केले. नांदेड ते उमरी हा प्रवास रेल्वेने करायचा नांदेडसाठी दिवसातून दोनच रेल्वे काचीगुडा ते मनमाड जाणाऱ्या आणि येणाऱ्या अश्या गाड्या होत्या उमरी येथील सामाजिक वनीकरणांच्या कार्यालयामध्ये रात्री वाचमन सोबत सर थांबायचे.दररोज पहाटे 5 च्या रेल्वेने नांदेडला जाऊन सकाळी 7 वाजता कॉलेज मध्ये जायचे उमरी येथे सरांचे मावसभाऊ बालाजीराव वाघमारे हे रोपवन अधिकारी होते त्यांच्या मदतीने पदवीनंतरचे शिक्षण पूर्ण केले तर शासकीय अध्यापक महाविद्यालय नांदेड येथून बी एड पूर्ण झाले.
एका गरीब कुटुंबात जन्माला आल्यामुळे दारिद्र्य सोबतच होते शिक्षण घेत असताना अनेक अडचणी आल्या हलाखीच्या परिस्थितीमूळे दोन वेळा पोटभर जेवायला ही मिळत नसे परंतु आठव्या वर्गाला उमरीच्या प्रवेश मिळवला कधीमधी सरांची मावशी उमरीला बाजार साठी यायची ती खर्चासाठी 25 पैसे द्यायची मंगळवार च्या बाजारातून खाण्यासाठी काहीतरी घेऊन द्यायची शनिवारी बितनाळ (बिद्रळी) ला ये म्हणायची घरात कोणीही शिकलेले नसल्यामुळे सरांना मार्गदर्शन करणारे कोणीही नव्हते.

जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे ! निराधार अभाळाचा तोच भार साहे!!

*जवाहरलाल नेहरू शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा प्राचार्य श्री दिलीपरावजी धर्माधिकारी यांनी श्री अक्कलवाड सर याना 2017 साली सदरील विध्यालयात पर्यवेक्षक म्हणून जबाबदारी दिली व ती अत्यंत चोखपणे पार पाडत पुन्हा त्याना 2019 साली संस्थेच्या संचालक मंडळांनी उपमुख्याध्यापक पदाचा कार्यभार सोपवला व ती जबाबदारी सरांनी शेवटपर्यंत प्रभावीपणे पार पाडली अक्कलवाड सरांच प्रसन्न व्यक्तिमत्त्व रुबाबदार वागणं सर्वांना आपलेसे करून घ्यायचे. विद्यालयातील शिक्षकांना समजाऊन घेऊन त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणारे अक्कलवाड सर विध्यर्थी प्रिय व कर्मचारी प्रिय होते. सरांच्या जवळ असणारी जिद्द, जगण्याच बळ आम्हाला कायमस्वरूपी प्रेरणा देत राहील असेच कोणालाही न दुखवण्याचा सरांचा स्वभाव होता म्हणून च जगद्गुरू तुकोबाराय एका ठिकाणी म्हणतात *लेकुराचे हित ! वाहे माउली चे चित्त ! ऐसी कळवळ्याची जाती ! करी लाभावीन प्रीती !!* अस सारंच व्यक्तीमत्व आहे *झाले बहू होतील बहू / पण या सम हा // त्यांच्या या सेवापूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने त्याना उदंड आयुष्य , यश कीर्ती व आरोग्य लाभो हीच मनःपूर्वक शुभेच्छा.*

✒️लेखक -तिप्पलवाड एन एम (एन टी सर)
(सहशिक्षक तथा सांस्कृतिक प्रमुख)जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बरबडा ता नायगाव जि नांदेड

▪️संकलन- माधव शिंदे, (नांदेड जिल्हा प्रतिनिधी)