दैठण येथे भर पावसात सुद्धा जनजागृती चा कार्यक्रम संपन्न

19

🔹रुग्ण सेवा समिती जनजागृती कार्यक्रम

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)

गेवराई(दि.28जून):- रोजच्या जनजागृतीच्या कार्यक्रमा प्रमाणे आज समितीने दैठन या गावात जाऊन भर पावसात जनजागृती चा कार्यक्रम घेतला.पावसाळ्याच्या दिवसात पाऊस तर पडनारच झाला!परंतु समितीने पावसाची परवा न बाळगता जनजागृतीच कार्य नेटाने चालुच ठेवले आहे व ठेवणार आहे.त्याच अनुषंगाने आज दैठन या गावी कोरानाविषयीचा जनजागृती कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पडला.विशेष म्हणजे बाहेर धो-धो पाऊस पडत असताना सुद्धा नागरिकांनी आपल्या घरात बसुन हा कार्यक्रम ऐकला.

कोरीनाविषयी असणारे गैरसमज तसेच असलेली भिती दुर व्हावी या उद्देशाने आज आम्ही आपल्या गावात आलो आहोत असल्याची माहिती शिरीष भोसले यांनी दिली.
तसेच कोरोना पासुन ते आताच्या म्युकरमायकोसीस पर्यंतच्या सर्व आजाराची संक्षिप्त माहिती बरोबरच लसीकरणा बाबत सुद्धा डाॅ दाभाडे यांनी अतीशय उपयुक्त माहिती दिली.
कोरोनाच संकट टळलेल नसुन आपण जर निष्काळजीपणा केला तर केव्हाही हा आजार आपल्या जिवावर बेतु शकतो अशी काळजीवाहु भिती डाॅ.अनिल दाभाडे यांनी व्यक्त केली.त्याचबरोबर कोरोनासारख्या आजारातून जाऊन सुद्धा आपल्या सारखी वेळ कोणावर येऊ नये किंवा जरी आली तरी न घाबरता कशाप्रकारे आपण या संकटाला सामोरे जायला पाहिजे याविषयीची माहिती व अनुभव प्रा.मासाहेब सरांनी व्यक्त केला.

अठरा वर्षाखालील मुलामुलींना मोफतपणे वाटल्या जाणार्या गोळ्यांची माहिती देऊन सर्व नागरिकांना त्यांच्या घरातील लहान मुलांसाठी होमीयोपॅथीक गोळ्यांच वाटप संपत दाभाडे,मासाहेब मॅडम यांनी केले तर हा ढोस कशाप्रकारे द्यायचा याची माहिती डाॅ हिंगे यांनी दिली. उपस्थित नागरिकांची बी.पी व ऑक्सिजन लेव्हल तपासून त्यांना योग्य तो वैद्यकीय सल्ला डाॅ.दाभाडे यांनी दिला.दैठन ग्रामस्थांच्या वतीने गावातील जीजाराव पंडीत यांनी समितीचे आभार मानुन आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमात माझ्यासह डाॅ.अनिल दाभाडे,मासाहेब सर,संपत दाभाडे,डाॅ.हिंगे सौ.मासाहेब मॅडम यांची उपस्थिती होती.