जातेगाव, सिरसदेवी, रेवकी, तलवडा, मंडळात अतिवृष्टी

20

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)

गेवराई(दि.29जून):- जिल्ह्यात रविवारी रात्री गेवराई, माजलगाव, परळी तालुक्यांत पावसाने दमदार हजेरी लावली, तर अन्य तालुक्यांत मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. पंधरा दिवसांच्या खंडानंतर पावसाच्या आगमनामुळे शेतकरी सुखावला आहे. सोमवारी सकाळपर्यंत मागील २४ तासांत जिल्ह्यात सरासरी २२.७ मिमी पावसाची नोंद झाली. २८ जून रोजी मागील २४ तासांत बीड तालुक्यात १९, पाटोदा ६, आष्टी ११.६, गेवराई ५५.३, माजलगाव ३३.१, अंबाजोगाई ८.१, केज ४.८, परळी २३.१, धारूर १४.१, वडवणी ३०.७, शिरूर कासार तालुक्यात २३.२ मिमी पाऊस झाला. १ ते २८ जूनपर्यंत एकूण सरासरी १८०.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
मागील २४ तासांत गेवराई तालुक्यातील जातेगाव, सिरसदेवी मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली.या मंडळांमध्ये ६५ मिमीपेक्षा जास्त पाऊस नोंदला आहे. जातेगाव मंडळात ८४ मिमी, सिरसदेवी मंडळात ७७.५, रेवकी मंडळात ८३.८, तर तलवाडा मंडळात ७३.३ मिमी पाऊस नोंदला आहे.

१०० मिमीपेक्षा जास्त पाऊस झालेली मंडळे

बीड तालुक्यात बीड, पाली, म्हाळस जवळा, राजुरी नवगण, पिंपळनेर, पेंडगाव, मांजरसुंबा, चौसाळा, नेकनूर, लिंबागणेश मंडळ

पाटोदा तालुक्यातील पाटोदा, दासखेड, थेरला, अंमळनेर मंडळात, तर आष्टी तालुक्यातील आष्टी, टाकळसिंग, दौलावडगाव, पिंपळा गेवराई तालुक्यात गेवराई, मादळमोही, जातगाव, पाचेगाव, धोंडराई, उमापूर, चकलांबा, सिरसदेवी, रेवकी आणि तलवाडा, माजलगाव तालुक्यात माजलगाव, गंगामसला, किट्टीआडगाव, तालखेड, नित्रुड, दिंद्रुड, अंबाजोगाई, पाटोदा(म.), लोखंडी सावरगाव, घाटनांदूर, बर्दापूर, केज तालुक्यात केज, युसूफ वहगाव, हनुमंत पिंपरी, होळ, विडा, बनसारोळा, नांदुरघाट, परळी तालुक्यात परळी, धर्मापुरी, नागापूर, सिरसाळा, पिंपळगाव गाढे, धारूर तालुक्यात धारूर, मोहखेड,तेलगाव, वडवणी तालुक्यात वडवणी, कवडगाव, शिरूर कासार तालुक्यात शिरूर, रायमोहा, तिंतरवणी मंडळ.
चार मंडळांत १०० मिमीपेक्षा कमी पाऊस बीड तालुक्यात नाळवंडी मंडळात अद्यापही पावसाने हात आखडता घेला असून केवळ ८१.२ मिमी पाऊस झाला आहे. आष्टी तालुक्यात कडा, धामरणगाव, धानोरा मंडळात आतापर्यंत १०० मिमीपेक्षा कमी पाऊस झाला आहे.
सर्वांत जास्त पाऊस परळी मंडळात
जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक ३५२ मिमी पाऊस परळी मंडळात नोंदला आहे. दिंद्रुड व पाटोदा (म.) मंडळाही ३०० मिमीपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे.

२८ दिवसांत १४ दिवस कोरडे

शनिवार आणि रविवारी झालेल्या पावसामुळे जमिनीतील ओल खोलवर गेली आहे. वापसा होताच खोळंबलेल्या पेरण्यांना वेग येणार आहे, तर काही ठिकाणी पेरण्या सुरू आहेत. १ ते २८ जूनपर्यंत जिल्ह्यात १३ ते १५ दिवस पाऊस झाला आहे.