मतदार यादीत छायाचित्र नसल्याने तुमचे नाव वागळणार

25

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)

हिंगणघाट(दि.३०जून):-मतदार यादीत आता तुमचे छायाचित्र नसल्यामुळे मतदारयादितुन नाव वगळणार असल्याची माहिती हिंगणघाट विधानसभा मतदरसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत यांनी प्रसारीत केलेल्या निवेदनात म्हंटले आहे.मतदारसंघातील मतदार यादी पाहून छायाचित्र जमा करण्याचे आवाहनसुद्धा त्यांनी यावेळी केले. लोकशाही प्रक्रियेत मतदानाचा हक्क बजावणे हे राष्ट्रीय कर्तव्य मानले जाते परंतु नवीन नियमानुसार मतदार यादीत छायाचित्र असणे अनिवार्य करण्यात आले आहे.मतदार यादीत छायाचित्र नसला तर मतदाराचे मतदार यादीतुन नाव वगळले जाईल.

हिंगणघाट विधानसभा मतदारसंघ अंतर्गत हिंगणघाट तालुक्यात एकूण १६६ मतदान केंद्र असून त्यापैकी १५० मतदान केंद्राच्या यादीत ५ हजार ९७९ मतदारांचे छायाचित्र उपलब्ध नाही, यांच्या बाबतीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्यामार्फत गृह भेटीदरम्यान छायाचित्र नसलेल्या मतदारा तेथे राहत नसल्याचे समोर आले आहे.

त्यांची नावे कटाक्षाने वगळळी जाईल,मतदानाचे कर्तव्य पुढेही सहजतेने करता यावे यासाठी मतदारांनी मतदार यादीत आपले छायाचित्र आहे किंवा नाही याची खात्री करून तहसील कार्यालयात जाऊन यादी तपासावी व ज्यांचे नावापुढे छायाचित्रे नाही,अशा मतदारांनी १० जुलै २०२१ पर्यंत आपल्या छायाचित्रामागे नाव लिहून हिंगणघाट येथील तहसील कार्यालयातील निवडणूक विभाग छायाचित्र जमा करावे,असे आवाहन हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत यांनी केले आहे.