महाराष्ट्र विकास विद्यार्थी (विद्यार्थीनी)आघाडीच्या जिल्हा प्रभारी अध्यक्षपदी कुमारी सोनवणे आकांक्षा बाबूलाल यांची एकमताने निवड

25

✒️शांताराम दुनबळे(नाशिक,जिल्हा प्रतिनिधी)

नाशिक(दि.1जुलै):-महाराष्ट्र विकास आघाडी पक्ष प्रणित महाराष्ट्र विकास विद्यार्थी आघाडीच्या नाशिक जिल्हा विद्यार्थिनी कार्यकारणी जिल्हा प्रभारी अध्यक्षपदी कुमारी आकांक्षा सोनवणे यांची निवड राज्य कार्यकारणीच्या वतीने व सर्व पदाधिकाऱ्यांच्या एक मताने करण्यात आली आहे.

नाशिक जिल्ह्यातील अभ्यासू विद्यार्थी नेतृत्व जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या संघटनेत सक्रिय सहभागी होऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सामाजिक शैक्षणिक व राजकीय कार्य धुरंधरीने करणाऱ्या कुमारी सोनवणे आकांक्षा यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र विकास आघाडी या पक्षाचे सर्वेसर्वा एड.अण्णारावजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र विकास आघाडी पक्ष प्रणित विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष विजय खूपसे पाटील त्याचबरोबर राज्य सचिव आदित्य बंडगर यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली व सोलापूर जिल्हाध्यक्ष अमित भैया चोपडे तसेच उपाध्यक्ष सचिन खोत त्याचबरोबर बीड जिल्हा विद्यार्थिनी अध्यक्ष कुमारी श्वेता नाईकवाडी तसेच बीड जिल्हा विद्यार्थिनी उपाध्यक्ष कुमारी आकांक्षा शेळके त्याचबरोबर नांदेड जिल्हा विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष प्रवीण जी श्रीरामे तसेच लातूर जिल्हा संघटक किशोर गुळवे त्याचबरोबर लातूर शहर संघटक आकाश काळे यांच्यासह सर्व जिल्ह्यातील मुख्य पदाधिकाऱ्यांच्या ऑनलाईन उपस्थितीमध्ये कुमारी आकांक्षा सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली.

यावेळी राज्यातील पदवीधर विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी वरती चर्चा व विचारविनिमय करून भविष्यातील पदवीधरांच्या कल्याणकारी धोरणांची योजना आखण्यात आली व विद्यार्थी कल्याणची धोरणाची दिशा ठरविण्यात आली.