नायगांव नगरपंचायतीचा भोंगळ कारभार – गजानन पाटील चव्हाण नायगांवर

20

✒️नायगाव(पुरोगामी संदेश नेटवर्क)

नायगांव(दि.1जुलै):-नायगांव ( खै ) नगरपंचायतीचे माजी भाजपा नगरसेवक / प्रतिनिधी तथा नांदेड जिल्ह्यातील दंबग युवा नेतृत्व गजानन पाटील चव्हाण नायगांवकर यांनी आज नायगांव शहरातील विठ्ठल नगर येथील सामाजिक कार्यकर्ते शिवानंद पांचाळ यांच्या राहत्या कुंटूबाच्या घरासमोर नायगांव नगरपंचायतीने नालीचे निमित्त लावून खोद काम केले आहेत , तो खोदकाम करून जवळपास दिड महीना झाला असुन नालीच्या निमित्ताने केलेला खड्या हा शिवानंद पांचाळ यांच्या कुंटूबासाठी / वयोवृध्द, किंवा लहान मुलां बाळांसाठी घातक ठरला आहे , कारण जमीन काळी मातीची आहे ,सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने त्या खड्यात पाणी जमा झाले असुन त्या खड्यात असंख्य मच्चर व ईतर जंतू निर्माण झालेआहेत.

त्यामुळे शिवानंद पांचाळ यांच्या व यांच्या जवळील असलेल्या शेजारी कुंटूबीयांना या कोरोना महामारीच्या काळात अनेक अजारांना पुढे तर जावेच लागेल पण या खड्यात लहान मुलं बाळ दुदैवाने जर पडले, किंवा वयोवृध्द असलेल्यांचा पाय निसटला अन् त्या खड्यात पडले , अन् त्यांना काही जिवित हानी झाल्यास कोण जबाबदार राहणार आहे , असा सवाल युवा नेते गजानन पाटील चव्हाण यांनी या वेळी केले आहेत, हा नायगांव नगरपंचायतीचा हालगर्जी पणा आहे असे ही व्यक्तव्य केले आहेत व सदरील नालीची पाहणी करून नायगांव नगरपंचायतीच्या संबधीत असलेल्या अधिकाऱ्यांना फोनद्वारे संपर्क साधून सदरील घातक असलेल्या नालीची माहिती देऊन तात्काळ नालीचे काम पूर्ण करून द्यावे अशी मागणीही केली आहे,