जिल्हा परिषद येथे हरित क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक यांना अभिवादन

22

✒️अंबादास पवार(विषेश प्रतिनिधी)

बुलढाणा(दि.1जुलै):- जिल्हा परिषद मध्ये १ जुलै महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, हरित क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येते. त्यानिमित्त बुलडाणा जिल्हा परिषद येथे स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. तसेच शेतकरी बांधवाना कृषी दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बुलढाना जि प अध्यक्षा सौ मनिषाताई पवार, तर प्रमुख उपस्थितीत उपाध्यक्षा सौ कमलताई जालिंधर बुधवत, सभापती पुनम ताई राठोड, राजेंद्र पळसकर, मु.का अ. श्रीमती भाग्यश्री विसपुते, मु ले अ, शिल्पा पवार, अति मु का अ राजेश लोखंडे, उप मु का अ संजय चोपडे, कृषी अधिकारी महातळे मॅडम, यांची उपस्थिती होती.

सर्वप्रथम मान्यवरांनी स्व वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच कृषी दिनानिमित्त शेतीमध्ये विक्रमी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. डॉक्टर डे निमित्तही मान्यवरांनी कोरोना काळात जनसामान्यांना उपचार देऊन केलेल्या सेवेबद्दल जिल्ह्यातील सर्व डॉक्टर यांना धन्यवाद देत शुभेच्छा दिल्या.
यावेळी जिल्हा परिषदेचे खाते प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, शेतकरी बांधव यांची उपस्थिती होती.