समृद्ध पर्यावरणासाठी वृक्षारोपण आवश्यक – प्रज्ञा साठे

22

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.1जुलै):-पर्यावरणातील प्रदूषण कमी झाले तरच वातावरणातील समृद्धी टिकून राहू शकते.पावसाचे कमी जास्त येणे चांगल्या वातावरणावर अवलंबून आहे.मोठ-मोठी जंगले आपण संपवीत चाललो आहोत.हे आपलं दुर्दैव आहे.त्या करिता झाडांचे वृक्षारोपण करीत राहिले पाहिजे.हाच पर्यावरणाच्या समृद्धी वरचा एकमेव उपाय आहे.असे मत एस.बी.आय.आष्टीच्या शाखाप्रमुख प्रज्ञा साठे यांनी व्यक्त केले. आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अँड.बी.डी.हंबर्डे महाविद्यालयाच्या प्रांगणात बँक डे निमित्त आणि वसंतराव नाईक जयंती निमित्ताने संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण करताना त्या बोलत होत्या.

यावेळी प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे,वीरेंद्र पाण्डे,मनोहर गावडे,डॉ.बाबासाहेब मुटकुळे,प्रा.अविनाश कंदले,प्रा.अशोक भोगाडे,डॉ.रवि सातभाई,डॉ.सुनील मुटकुळे उपस्थित होते.संस्थाध्यक्ष किशोर नाना हंबर्डे,सचिव अतुल शेठ मेहेर यांच्या प्रेरणेने घेण्यात आलेल्या वृक्षारोपणासाठी बँकेचे कर्मचारी विशाल रूटवडकर,नितीन भोई,परसराम खोटे,अंकुश शिंदे,अभिषेक भोंडे,कार्तिक मल्साने,संदीप हंबर्डे,अनिल रोकडे,अभिजीत भोज,उमेश एकशिंगे,महादू निकाळजे,शेख  मोहसीन आदी उपस्थित होते.सूत्रसंचालन डॉ.मुटकुळे यांनी केले तर कवी प्रा.सय्यद अलाऊद्दीन यांनी आभार मानले.