ए.आय.एम.आय.एम मध्ये अनेक कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश

26

✒️तालुका प्रतिनिधी(महादेव उप्पे)मो:-९४०४६४२४१७

हणेगाव (दि.०२) देगलूर तालुक्यातील हणेगाव येथे एम आय एम मध्ये असंख्य कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश करण्यात आला. एम आय एम चे महाराष्ट्र सेक्रेटरी व मराठवाडा अध्यक्ष माननीय फिरोज लाला आणि नांदेड जिल्हा अध्यक्ष माननीय मिर्झा अमजद बेग यांच्या निर्देशाने एमआय एम तालुकाध्यक्ष सय्यद सलिमोद्दिन विधानसभा देगलूर बिलोली अध्यक्ष हाफिस अब्दुल रहीम, देगलूर कार्यकारी अध्यक्ष ताहेर देशमुख, यांच्या उपस्थितीत असंख्य कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश करण्यात आला व त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी देगलूर बिलोली विधानसभा अध्यक्ष हाफिस अब्दुल रहीम, देगलूर तालुका अध्यक्ष सय्यद सलिमोद्दिन, कार्यकारी अध्यक्ष ताहेर देशमुख,शेख अब्दुल खादर (बब्लु) ,महमद जाकीर,असद हाशमी सर,हणेगाव चे ज्येष्ठ कार्यकर्ते शेख युनूस, इस्माईल चौधरी, इमरान पांढरे, समीर पटेल, खालीक चौधरी, इसाक, चौधरी,शेख मोहसीन, सरदार पटेल, वसीम दापकेकर, गौस मनियार,व आदी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.