मंगेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्य रुग्णांना फळे वाटप…

24

✒️अशोक हाके(बिलोली,ता.प्र.)मो.नं.9970631332

बिलोली(दि.2जुलै):- तालुक्यातील कुंडलवाडी येथे
आगामी होऊ घातलेल्या देगलूर बिलोली विधानसभा मतदार संघ पोटनिवडणुकीचे काँग्रेस पक्षाचे इच्छुक उमेदवार मंगेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रुग्णांना फळे,मास्क,व सॅनिटायझर व आरोग्य कर्मचाऱ्यांना मास्क,सॅनिटायझरचे वाटप करून एक सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.तसेच शहरातील पोलीस स्टेशन येथे पोलीस कर्मचाऱ्यांना मास्क,व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले,यावेळी शहरात विविध ठिकाणी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला आहे.

यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.विनोद माहुरे,डॉ.नरेश बोधनकर,सहायक पोलीस निरीक्षक सुरेश मान्टे,हर्ष कुंडलवाडीकर,महिंद्र गायकवाड,शशिकांत गाडे,अमरनाथ कांबळे,शेख वाजीद,पत्रकार महमद अफजल,रुपेश साठे,लक्ष्मण गंगोने,सी.एन. जाधव ,अंगद मुंडे ,अमेटवार ,पवळे ,सूभाष पवार ,शेख , गायकवाड ,गुट्टूवार, निता सिस्टर, वंदना ,तोटावार, भावेश‌,खाजाभाई आदीसह मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते…..