शेतकऱ्यांना तातडीने बोनसचे वाटप करा – नेमाजी घोगरे यांची मागणी

22

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.2जुलै):-उद्योगविरहित चामोर्शी तालुक्याची शेती आणि शेतमजूरीवर मदार आहे.अश्यावेळी तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या मिळकतीचे धान्य शासकिय धान्य खरेदी केंद्रावर विकले.मात्र त्यांना बोनसची रक्कम अद्याप मिळालेली नाही.दरम्यान सततच्या लाॕकडाऊनमूळे नागरिकांचा रोजगार बुडाला.आधिच विवंचनेत मेटाकूटिस आलेल्या शेतकऱ्यांपूढे आता हंगामाचे दिवस आले.अश्यावेळी त्यांना आर्थिक चनचन भासू लागली आहे.यामूळे राज्यसरकारने जाहिर केलेला बोनस शेतकऱ्यांना तात्काळ वितरीत करण्यात यावा,अशी मागणी चामोर्शी रा यु कॉ चे तालुका अध्यक्ष नेमाजी घोगरे यांनी केली आहे.

चामोर्शी तालुक्याची भिस्त शेती आणि शेतमजूरीवर आहे.या तालुक्यात रोजगाराचे ठोस साधन नाही.शेतीचा हंगाम आटोपला की,तालुक्यातील नागरिक रोजगाराच्या शोधात ईतरत्र भटकतात.अश्यातच सततच्या लाँकडाऊनमूळे नागरिकांचा रोजगार बुडाला.परिणामी जनसामान्यांचे कंबरडे मोडले.आता “ब्रेक द चेन” नंतर शासनाकडून निर्बंध हळूहळू शिथिल केले जात आहेत.अन बळीराजा घराबाहेर पडून हंगामात व्यस्त झाल्याचे चित्र आहे.सन २०२०-२१ मधिल खरीप खंगामातील धान्य बहुतांश शेतकऱ्यांनी तालुक्यातील शासकीय धान्य खरेदी केंद्रावर विकला.या शेतकऱ्यांना ५० क्विंटलपर्यंत मिळणारा ७०० रुपये बोनस अद्याप मिळालेला नाही.परिणामी तालुक्यातील शेतकरी राज्यशासनाने जाहिर केलेल्या बोनसच्या प्रतिक्षेत आहेत.

अश्यावेळी नविन हंगाम कसतांना शेतकऱ्यांपूढे आता मोठे संकट निर्माण झाले आहे.याततच बि-बियाणे,खते,किटकनाशके आदि खरेदी करतांना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे.यातच वाढलेली मजून अडचणीत असलेल्या बळीराज्याला न परवडणारी आहे.यासाठी म्हणून आर्थिक विवंचनेत असलेल्या बळीराज्याला “मदतीचा हात” म्हणून राज्यसरकारने प्रती क्विंटल ७०० रुपये बोनस देण्याची घोषणा केली,मात्र ती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात यायला उशिर होत आहे.यामुळे शेतकरी वर्गात नाराजी दिसून येत आहे.चालू हंगामात शेतकऱ्यांना मशागत आणि ईतरही कामकाजासाठी हातभार लागावा,यासाठी शेतकऱ्यांना तातडीने बोनसचे वाटप करावे,अशी मागणी निवेदनातून नेमाजी घोगरे यांनी केली आहे.