अतिदुर्गम मंगेवडा येथे नवीन वर्गखोलीचे भूमिपूजन

18

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.3जुलै):-धानोरा तालुक्यातील पेंढरी- गट्टा क्षेत्रातील ग्रामपंचायत कामनगड अंतर्गत येत असलेल्या छत्तीसगड सीमेलगत असलेल्या मौजा मंगेवडा येथील वर्गखोली बांधकामाचे भूमिपूजन मा मनोहर पोरेटी उपाध्यक्ष जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या हस्ते करण्यात आले.मंगेवडा येथील शाळा ईमारत मोडकडीस आल्याने वर्गखोलीची नितांत गरज होती, त्यामुळे सरपंच संजय गावडे यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना विचारणा करून पाठपुरावा केला होता. त्यामुळे त्याची तात्काळ दखल घेत मंगेवडा येथे वर्ग खोलीचे भूमिपूजन करण्यात आले.

याप्रसंगी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, जिल्हा परिषद सदस्य विनोद लेनगुरे, माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीनिवास दुल्लामवार, कामनगड ग्रामपंचायतीचे सरपंच संजय गावडे, उपसरपंच रमेश वालको, माजी सरपंच छबिलाल बेसरा, गाव पाटील दिलीप वालको, ग्रामसेविका कोडापे मॅडम, नागमोते सर, हसन गेडाम सर, अंगणवाडी सेविका वनिता वालको, जगदीश वड्डे, साईनाथ वसाके, प्रकाश लकडा, शिपाई मनिराम गावडे, सिताराम पदा, शांताराम तुलावी व गावकरी उपस्थित होते.