मानव विकास परिषदच्या तालुका अध्यक्षपदी मोहम्मद हमीद शेख इस्माईल यांची नियुक्ती

29

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.5जुलै):-मानव विकास परिषद महाराष्ट्र राज्य या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा संस्थापक सफसर शेख तसेच मानव विकास परीषदचे प्रदेश अध्यक्ष बळवंतराव मनवर यांनी मानव विकास परिषद महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या नवनियुक्त व सामाजीक कार्यात तत्पर्य कार्यशिल सर्व सामाण्याच्या न्यायासाठी झटणारे तरूण तडफदार सामाजिक कार्यकर्ते व गोरगरीबांच्या हितासाठी अहोरात्र झटणारे मोहम्मद हमीद शेख इस्माईल यांची कामगीरी व कार्याची पावती म्हणुन या पदाचा कार्यभार सोपविला आहे तो मी पुर्णपणे तन,मन,धनाने सर्व सामण्याना व पिडीतांना न्याय मिळवुन देण्याचा प्रयत्न करिलं कोणत्याही प्रकारचे संघटनेला गालबोट लागेल असे कृत्य करणार नाही.

गरीबांना रितसर कायदयाच्या चौकटीत राहुन व नियमाचे पालन करुन न्याय मिळवुनच देईल व न्यायला वाचा फोडण्याचे काम करेल असे यावेळी अश्वासन देतो,माझ्यावर जो विश्वास संपादन करण्यात आला तो मी तडा जाऊ देणारच नाही व माझे कार्य पुर्ण पार पाडेल, असे या वेळी स्वतःच मत व्यक्त शेख यांनी केले आहे,त्यांच्या या नियुक्तीमुळे त्याच्यावर अभीनंदनाचा वर्षाव होत आहे,