वृक्षारोपण करुन साजरा केला ना.बच्चू भाऊ कडू यांचा वाढदिवस

30

✒️अमोल उत्तम जोगदंडे(उमरखेड प्रतिनिधी)मो:-8806583158

उमरखेड(दि.5जुलै);-राज्यमंत्री ना. बच्चू भाऊ कडू यांच्या वाढदिवसा निमित्त 5 जुलै रोजी वृक्ष संवर्धन समिती उमरखेड च्या परिसरामध्ये प्रहार शिक्षक संघटना उमरखेडच्या वतीने वृक्षारोपण करून मा.बच्चू भाऊ कडू यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. सृष्टिनिर्मित घटकांमध्ये सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे वृक्ष.वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरे असे तुकाराम महाराज म्हणतात.

या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष श्री. संदीप बलखंडे, सचिव श्री.प्रविण देवसरकर,जेष्ठ व संघटनेचे मार्गदर्शक श्री.कटकमवार सर, कार्याध्यक्ष श्री. विजय चौरे सर, जिल्हा महिला संघटिका ताई बोडखे, तालुका संघटक राजेंद्र पाटील, प्रसिद्धी प्रमुख सुधाकर कवडे ,श्री.संदिप कदम,संदिप सरवदे व इतर प्रहार मित्र परिवार व वृक्ष संवर्धन समितीचे सदस्य उपस्थित होते.