राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाने सादर केले आरक्षणाबाबत निवेदन

30

✒️अमोल उत्तम जोगदंडे(उमरखेड प्रतिनिधी)मो:8806583158

उमरखेड(दि.5जुलै):- राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागातर्फे मुख्यमंत्री यांच्या नावाने उपविभागीय अधिकारी यांना आरक्षणा संदर्भात निवेदन सादर केले.
निवेदनात स्थानिक स्वराज्य संस्था मधील ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण अबाधित ठेवणे, SC/ST मागासवर्गीय कर्मचारी पदोन्नती मधील आरक्षण अबाधित ठेवणे, मराठा आणि मुस्लिम समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे,ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे आदी मागण्या नमूद आहेत.

उमरखेड येथील उपविभागीय अधिकारी यांना राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्यावतीने निवेदन सादर करते वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. वि. ना. कदम, विधानसभा अध्यक्ष भीमराव पाटील चंद्रवंशी, जेष्ठ नेते विठ्ठलराव हनवते, भास्करराव पंडागळे, बळी तात्या चव्हाण, अशोकराव मोरे, ऍड. दिनेश हनवते, अविनाश असोले, अविनाश यादवकुळे, ऍड बळीराम पाटील मुटकुळे, गौतमराव दवणे, गणेश पाठमोरे डॉ. प्रेम हनवते जिल्हाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस उपस्थित होते.