सुशिक्षित बेरोजगारांचे शासकीय बळी आणखीन किती स्वप्नील लोणकर ?

19

✒️लेखक:-ऍड अविनाश टी काले,अकलूज ता, माळशिरस, जिल्हा सोलापूर, 9960178213

 

काल पुणे येथील फुरसुंगी विभागातील गंगा नगर मधील स्वप्नील सुनील लोणकर या 24वर्षीय युवकाने बेरोजगारीला कंटाळून आणि जीवनातील आशावाद संपुष्टात आल्याने आत्महत्या केली.
एम पी एस ची पूर्व व मुख्य परीक्षा 2017व 2020मधे पास होऊन ही मुलाखत च न झाल्याने शासकीय नौकरी ची आशा मावळून गेली.काल दिवस भर या बातमीचा रतीब प्रसामाध्यमांद्वारे घातला गेला असेल.लोक हळहळले असतील
अश्रूंचे बांध ही फुटले असतील तर अनेक पालकांच्या छात्तीत धडधड ले ही असेल.पुढच्या पिढीचे भवितव्य काय?हा यक्ष प्रश्न बेरोजगारी त जगणाऱ्या पालकांच्या मनात उभा राहिल्या शिवाय राहणार नाही.आपली रोजी रोटी लघु उद्योगातून चालवत जगणारे स्वप्नील चे आई वडील पुण्याचे शनिवार पेठेत बिल बुके बनवण्याचे काम करीत कोरोना काळात सर्वच व्यवसाय बंद ठेवले गेल्याने व हा अतिरेक वारंवार महाराष्ट्र शासनाने केल्या मुळे सामान्य माणसांनी आपले कुटुंब कसे जगवावे?हा साधा प्रश्न ही व्यवस्थेला पडला नाही.

आपत्ती व्यवस्थापनाचे कारण देत व्यवसाय बंद , उद्योग जगत बंद, शासकीय नौकरी तील भरती प्रक्रिया बंद , पोलीस भरत्या बंद,म्हणून जगणे ही बंद काय दोष होता स्वप्नीलचा आणि स्वप्नील सारख्या युवकांच्या कोट्यवधी आई वडिलांचा?
त्यांना स्वप्ने नव्हती त्यांच्या मुलांना अजित दादा बनवण्याची , अविनाश भोसले सारखी हेलिकॉप्टर घेण्याची किंवा आदित्य ठाकरे बनून मंत्री होण्याची,ते शरदचंद्र जी पवार साहेब नव्हते की उद्धव जी ठाकरे नव्हतेती माणसे साधी होती, त्यांची स्वप्ने साधी होती , आपण जगावे व जगताना आपल्या वाट्याला जे दुःख आणि दारिद्र्य आले त्याचा नायनाट पुढच्या पिढीने करावा. किमान ती दुःखे त्यांनी भोगू नयेत म्हणून स्वतः चे जीवाचा आटपिटा करत त्यांनी मुलांना स्वप्ने दाखवली ती पूर्ण व्हावी म्हणून त्यांनी कष्ट उचलले , पोरांना महागड्या शाळेत घातले , पदवी मिळाल्या नंतर वेगवेगळ्या कोचिंग क्लासेस ला घातले त्यांच्या भल्या मोठ्या फी ही भरल्या , पुण्या सारख्या शहरात खानावळी लाऊन दिल्या.

मुलांनी ही त्यांच्या आई वडिलांना धोका दिला नाही त्यांनी ही त्या खानावळीत जेवणाला चव असते की नाही हे कधी पाहिलं नाही.मला हे नको , ती भाजी मला आवडत नाही म्हणून लहानपणी जेवण्यास नकार देणाऱ्या मुलाला दुसरा स्वयंपाक करून खाऊ घालणारी आई त्याला शहरात भेटणार नव्हती.
भावना हिन तेच्या तीव्र स्पर्धेत पाठीशी खंबीर पने उभे राहून लढ म्हणणारा बाप शहरात त्याला भेटणार नव्हता.
माझ्या बापाच्या बनियनला पडलेली भोके मी माझ्या कष्टाने बुजविन म्हणून पोरग पळत राहील.आई बाप , मुलगा , मुलगी सारे पळत राहिले, त्यांना काय माहित?ही व्यवस्था कुत्र्या मांजराचा खेळ त्याचे सोबत खेळत आहे.शासन व्यवस्थेने खाजगीकरण, जागतिक उदारीकरण, मुक्त बाजार स्पर्धा धोरण अंगिकारून बरीच वर्ष लोटून गेली. आहेत•जगाने जे जे स्विकारले ते ते आम्ही ही स्विकारले अनेक सार्वजनिक क्षेत्रातून सरकारने माघार घेत त्याचे खाजगीकरण केले, त्यात खाणी, वीज निर्मिती , त्याचे वहन आणि वितरण, पायभूत उद्योग , सार्वजनिक वाहतूक , शिक्षण, बँकिंग हे सारे विभाग आज आक्रसून गेले आहेत.

कायम स्वरुपी नौकरी ऐवजी कंत्राटी भरती हा परवलीचा शब्द झाला आहे पेन्शन धारकांचे कायम स्वरुपी ओझे आत्ता व्यवस्थेला ही नको आहे.नवीन रोजगार निर्माण होतील असे उद्योग उभे रहात नाहीत, शेती क्षेत्र कमालीचे तोट्या चां व्यवहार झाला आहे गाव खेड्यात ही आलेल्या यांत्रिकीकरणा ने इथे ही श्रमाला वाव उरलेला नाही.शेती सोडून ज्या लोकांनी शहरा कडे रोजगाराच्या शोधात धाव घेतली त्यांचा ही भ्रम निरास झाला आहे.सगळी कडे अस्वस्थता आहे सरकार बेरोजगारीचे खरे कारण लोकांना सांगत नाही व्यवस्था ही ते सांगत नाही, राजकारणी तर कधीच सांगणार नाहीत, त्यांना समाजा समाजात भांडणे हवी आहेत त्यातील कांहीं लोक आरक्ष्णा कडे बोट दाखवतात या मुळे तुमच्या संध्या गमावल्या जात आहेत असे दर्शवतात आणि आपल्या ही मुलांचे भविष्य सुखरूप व्हावे म्हणून लोक आरक्षणाचे दिशेने ही धावत राहतात.
1953 साली काकासाहेब कालेलकर यांनी आपल्या अहवालात नमूद केले होते व गंभीर इशारा दिला होता.
Unemployment is a biggest challenge on the day we are sitting now a volcano
बेरोजगारी चे भीषण आव्हान आपल्या समोर आहे आपण ज्वालामुखीच्या तोंडावर बसलेले आहोत.

त्याची दाहकता समाजव्यवस्थेच्या लक्षात आली नाही कधी येणार ही नाही भारतीय माणूस , भारतीय समाज हा लाकडा सारखा आहे जे पुढच्या टोकाला जळत असताना ही हाताला जळत असल्याची जाणीवच होऊ देत नाही आग जेव्हा हाता पर्यंत पोहचते तेंव्हाच हे लाकूड जळत आहे हे समजते
आपली दुःखे विसरून तो काल्पनिक जगात जगत राहतो हेच त्याचे खरे दुखणे आहे
सिनेमा पाहताना आपण ही रडतो, आपला ही राग खलनायकाच्या विरोधात व्यक्त होतो ते पडद्यावर घडतं असते पण तात्पुरते का होईना, आपल्याला ते खोटे असल्याचा विसर पडतो नायकाच्या आत आपण स्वतः ला झोकून देतो हेच वास्तव जीवनात ही घडत असते राजकारणाशी आपल नात इतकं जोडल जात की त्यातील नेत्या मधे आपण आपल्याला पाहतो. ते आपले लोक प्रतिनिधी नसतात तर आपलेच प्रतिनिधी असतात जाती व्यवस्थेने याचे सुलभीकरण अजून केले आहे.भाजपा चे नैसर्गिक समर्थक मला ब्राह्मण मंडळीत 99% दिसतात.

तर राष्ट्रवादीचे नैसर्गिक समर्थक मला पच्छिम महाराष्ट्रात मराठा समाजात दिसतात, उर्वरित विभागात ते काँग्रेस मधे दिसतात.
नेतृत्वाचे जाती वरून लोक आपला परका पक्ष ही ठरवतात हे ही मला अलीकडे जाणवू लागलेले आहे.पण तसे नसते राजकारणी म्हणून त्यांचे नाते राजकारण्यां शी च असते हे ही आपण समजून घेतले पाहिजे ते सामान्य माणसाशी कधीच नसते म्हणून ते फारसे अस्वस्थ होत नाहीत व हे घडतं राहणार म्हणून ते दुर्लक्ष करत राहतात.सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडीयन इकॉनॉमी चे नोंदी नुसार 2014मधे भारतात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या 14कोटी होती 2018चे ऑक्टबरपर्यंत ती 30 कोटी झाली आहे.
बांधकाम, माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात ही फक्त 1•9%लोकांना रोजगार संधी आहे.ग्रामीण भागातील 82%मुलांचा कल हा शासकीय नौकरी कडे आहे.भारतीय रेल्वे विभागात 1लाख20हजार जागांसाठी 24कोटी अर्ज आले होते.अगदी ज्यांनी विविध क्षेत्रात डॉक्टरेट मिळवल्या ते ही कमी कुवतीच्या जागेवर नौकरी करण्यास तयार आहेत.सामाजिक सुरक्षा आणि किमान वेतन याची उच्चतम पातळी ही सरकारी नौकरी त अधिक असल्याने ती मिळावी असा आग्रह लोकां चा असतो.

C M I R अर्थात सेंटर मॉनिटरिंग फॉर इंडीयन इकॉनॉमी चे 2019ऑक्टो / नोव्हेंबर चे आकडेवारी नुसार बेरोजगारीचा हा दर 8•45%पर्यंत पोहचला आहे. त्रिपुरा हे भारतातील सर्वाधिक बेरोजगारी मधील राज्य आहे. तिथे 28•6%बेरोजगारी आहे.
फक्त कर्नाटक आणि आसाम मधे ती 0•9%इतकी कमी आहे.
महाराष्ट्र सरकारने काढलेल्या पोलीस भरती ही मराठा आरक्षण कोर्टाने स्थगित केल्या बरोबर स्थगित केले.मराठा समाजाला आरक्षण दिले जात नाही तो पर्यंत एम पी एस सी ची परीक्षा घेऊ दिली जाणार नाही, अश्या ही भूमिका संघटनांच्या वतीने घेण्यात आल्या.काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचां आधार बनलेल्या मराठा समाजाला अंगावर घेण्याची मानसिकता त्या पक्षाचे राजकीय नेत्यात नव्हती म्हणून या नेत्याच्या कुबड्या चे आधारे उभ्या असलेल्या शिवसेनेला ही एस सी /एस टी/ओबीसी/अल्पसंख्यांक/भटके विमुक्त यांचा विसर पडला.
मुलांचे आयुष्य बरबाद होऊ नये तुम्ही 16%बाजूला ठेऊन इतरांच्या भरती करा, परीक्षा घ्या असे ओबीसी नेत्यांनी सरकारला विनवून पाहिले पण त्याचा उपयोग झाला नाही.

आम्ही कोणत्या सत्तेला जवळ करायचे?
फक्त छत्रपती शिवराय , मावळे यांचा उदघोष करणारे की आमच्या मुला बाळाच्या भवितव्यावर नांगर फिरवून त्यांचे आयुष्य राखरांगोळी करुन टाकणाऱ्या सत्तेला आम्ही आमचे मानायचे?मला अजित दादा मधे मी दिसत नाही, पवार साहेबात मी किंवा माझा समाज दिसत नाही, त्यांचे धोरणात आमचे प्रतिबिंब दिसत नाही. ते काँग्रेसच्या देशमुख, पाटील, चव्हाण यांचेत्त दिसत नाही ना शिवसेनेच्या ठाकरे मधे ते दिसते आहे मग या सरकारला आम्ही आमचे सरकार कसे म्हणू?
असलेच तर ते सरकार आमदार संजय गायकवाड याचे सारख्याच आहे. जे दहा हजार लोक घेऊन दलितांवर हल्ला करण्याची भाषा बोलतात , दलितांवर झालेल्या अन्यायाविरोधात त्यांनी कायद्यातील तरतुदी द्वारे न्याय मागितला तर त्यांचे विरोधात क्रॉस कंप्लेंट करून त्यांना दरोडेखोर ठरवा असे सांगणाऱ्या लोकांचे हे सरकार आहे.हे सरकार दलीत , आदिवासी, भटके विमुक्त ओबीसी चे सरकार आहे असे मला वाटेनासे झाले आहे.

काल पेटली ती वस्ती मुजोर होती गावात सज्जंनाच्या आता बाका तणाव नाही.तसा स्वप्नील चे आत्महत्येचा तणाव या सरकारला असण्याचे कारण ही नाही.हे सरकार तोंडाला मास्क लावा हात धुवा काळजी घ्या हे सांगत राहील पण कसे जगावे या प्रश्नाचे उत्तर देण्याची धमक या सरकार कडे नाही.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेल्या उद्धव जी ठाकरे यांच्यात मी छत्रपती शिवरायांना पाहण्याचा प्रयत्न गेली, अनेक वर्ष करतोय एखादी लकब तरी एखादे साम्य तरी?
पण मला तरी ते दिसतच नाही त्यास मी तरी काय करू?
*****
स्वप्नील एकटा नाही मला असे हजारो स्वप्नील दररोज भेटतात त्यांच्या डोळ्यात मला स्वप्ने तरळताना दिसतात त्यांची भाव विश्व मी पाहतो जीवनाची किती सुंदर स्वप्ने ते पाहतात , त्या स्वप्नाच्या पूर्ती साठी ते जीव घेऊन धावतात शर्यत जिंकली की मी जगणार म्हणून ते धावत राहतात ह्या स्पर्धा जगणे आणि मरणे यातील सूक्ष्म विभाजक रेषा असते.
लोक स्वप्नील ला विसरतील एक दुर्दैवी अपघात म्हणून थोडंसं थबकतील, थोडंसं हळहळतील पण पुन्हा धावत राहतील जीवाच्या आंकांता ने
***
भारतीय समाज हा क्रांती करण्याचे बळ हरवलेला समाज आहे.
तो जाती धर्म याचा विचार करतो व त्याच विचारात जगतो.
मी काय बोलतो काय लिहतो या पेक्षा मी कोणत्या जातीचा आहे हे शोधण्या कडे लोकांचा कल असतो.
सोलापूर येथे असताना बहुजन समाज पार्टी चे मेळाव्यात औरंगाबाद येथील आर के त्रिभुवन यांचे दे दान सुटे गिरान या पुस्तकावर मी मनोगत मांडले,
बसपा मधे कार्यकर्त्याची जात ही वहीत लीहली जाते. त्यांनी माझ्या पुढे वही केली व त्यावर सही करण्यास सांगितले. मी पाहिले जात रकान्यात माझी जात मातंग होती.
असाच दुसरा किस्सा मला. अंगावर रंग आवडत नाहीत, सोलापूर येथे असताना मी दाढी ठेवली होती. मुळात ती मला हूनव टी वरच येते म्हणून तिला मी तसा फ्रेंच लूक दिला होता. एक टोळके माझ्या कडे रंग टाकण्यास आले ,मी त्यांना म्हणालो, आमचे धर्मात रंग खेळत नाहीत, त्यावर ते निघून गेले, जाताना ते म्हणत होते, त्यांचे त रंग खेळत नाहीत पण याची टोचणी नंतर मला कितेक दिवस लागून राहिली होती की मी स्वतः ला रंगा पासून वाचवण्या साठी धर्माची ढाल पुढे केली होती.
आपले सरकार चालावे आपण राजकारणात जिंकावे म्हणून अश्या ढाली पुढे केल्या जात असाव्यात का?
हा मला पडलेला प्रश्न आहे याचे कारण त्याचा मला अनुभव नाही
*******
1984साली मी 11वित प्रवेश घेतला होता व मला कविता करण्याचा छंद लागलेला होता तेव्हा मी बेरोजगारी वर कविता केली होती.
ती लिहून मी या लेखाचा समारोप करतो.
****
स्वप्नाच्या दुकानात

काल मी स्वप्नाच्या दुकानात गेलो होतो, स्वप्न विकत घेण्यासाठी
स्वप्नांची झुळझुळीत वस्त्रे शोकेस मध्ये हॅगर ला टांगलेली
दुकानातील पोऱ्याने विचारले,
कोणते मूल्य आणले आहे स्वप्न विकत घेण्या साठी?
माझ्या काखोटीला होती पदव्या ची भेंडोळी
जी मी मिळवली होती रक्त घाम अश्रू यांनी
सार्थ अभिमानाने मी म्हणालो
हेच ते मूल्य मी मिळवलय रक्त घाम आणि अश्रू गाळून
म्हणत ती भेंडोळी पुढे केली
त्याने मला विचारले
दुसर कोणत मूल्य आणल आहे का स्वप्न विकत घेण्या साठी?
माझी मान नकारार्थी
तुम्ही आहात का जॉईन सत्ताधारी बा विरोधी पक्षाशी?अथवा पुरोगामी बा प्रतिगामी चळवळीशी(दलाल)?
माझी मान नकारार्थी
इतक्यात मालक कडाडला
SSSSSSS
मूर्खा SSSSSS
अश्रूंची फुले होण्याचे दिवस बंदिस्त आहेत कवितेच्या चोपड्यात
तो घाम कुजला जातोय युगानु युगे मातीत
आणि रक्त पिसले जातेय यंत्राच्या चक्रात
तुझ्या सारख्या भनंगाना आम्ही स्वप्न विकत नसतो म्हणत
दे माय ठेऊन दिल्या बकाळीत
पाठीत , पोटातssssss
तेव्हा पासून फिरकत नाही स्वप्नाच्या दुकानाकडे
स्वप्न विकत घेण्या साठी
स्वप्न विकत घेण्या साठी,,,,,,,,,,,,!
स्वप्नील लोणकर यास ही कविता समर्पित करून इथेच थांबतो*तूर्त इतकेच,