म्हसवड व परिसरातील कोरोना लसीकरणाचा महिलांनी लाभ घ्यावा

20

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मोबा.9075686100

म्हसवड(दि.6जुुुलै):-येथील माणदेशी फौंडेशन आणि बेल एअर हॉस्पिटल,पाचगणी यांच्या संयुक्त विध्यमाने महिलांसाठी मोफत कोरोना लसीकरण शिबिर आयोजित केले आहे.हे शिबिर 7 जुलै ते 10 जुलै या कालावधीत होणार असून या लसीकरणाचा फायदा म्हसवड व परिसरातील महिलांनी घ्यावा असे आवाहन माणदेशी फौंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती चेतना सिन्हा यांनी केले आहे.यावेळी चेतना सिन्हा म्हणाल्या ‘कोरोना काळात अनेक कुटूंब उध्वस्त झाली अनेकांनी आपले।प्राण गमावले सामाजिक जाणिवेतून खारीचा वाटा म्हणून माणदेशी फौंडेशन या संस्थेने गोदवले बुद्रुक,ता.माण येथे तालुक्यात पहिले सुसज्ज कोरोना हॉस्पिटल उभारले.कोरोना रुग्णाकरिता फौंडेशनने नुकत्याच दोन कार्डियाक अम्ब्युलन्स विनामूल्य रुगणाच्या सेवेसाठी दिल्या आतापर्यत कोरोना काळात रुग्णाना विविध माध्यमातून मदत केली.

परंतु आज शासन स्तरावर लसीकरण चालू असून त्यामध्ये शासनाला मदत व्हावी या हेतूने हि लस मोफत दिली जाणार आहे.लसीचा पुरवठा हा मर्यादित होत असल्यामुळे लस उपलब्ध व्हायला वेळ लागत आहे.यामुळे लसीकरण केंद्रावर महिला अनेक तास ताटकळत बसावे लागते आहे ही बाब लक्षात घेऊन माणदेशी फौंडेशनच्या चेतना सिन्हा यांनी महिलांसाठी मोफत लसीकरण शिबिर आयोजित करण्याचे ठरविले आहे.यासाठी बेल एअर हॉस्पिटल ,पाचगाणी यानीही सहकार्य करण्याचे मान्य केल्यामुळे माणदेशी फौंडेशन आणि बेल एअर नि संयुक्त लसीकरण शिबिर करण्याचे ठरविले ज्या महिलांनी अध्याप पहिली लस घेतली नाही त्या महिलांनी आपल्या नावाची नोंद वनिता पिसे,योगिता झिमल,शाहीन मुलांनी,लता जाधव यांच्याशी सम्पर्क करावा असे आवाहन केले आहे.