चिथावणीखोर वक्तव्य करणारे बुलढण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करून त्वरित कारवाई करणेत यावी

21

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मोबा.9075686100

बुलढाणा(दि.6जुलै):- विधानसभेचे शिवसेना आमदार संजय गायकवाड हे खामगाव दौऱ्यावर असताना तेथील मागासवर्गीय लोकांचेवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात बोलताना द्वेष भावनेने गरळ ओकली ते एक लोकप्रतिनिधी या नात्याने अशोभनीय वर्तन आहे आमदार संजय गायकवाड यांनी वादग्रस्त विधान करून मागासवर्गीय समाजाच्या भावना भडकवण्याचा प्रयत्न केला असून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

दलित विरोधी कायद्यानुसार त्याच्यावर आई पी सी 153,153 अ,153 ब, व ऍट्रॉसिटी आय पी सी 107 या कलमांनवये त्याच्यावर गुन्हा दाखल करून तात्काळ कारवाई करण्यात यावी.अन्यथा येणाऱ्या काळात आमदार संजय गायकवाड चिथावणीखोर वक्तव्य करून समाजभावना भडकवत असतील तर रिपाई त्यांना जशास तसे उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही व त्याचाविरोधात आंदोलन छेडले जाईलअसे माण तालुका रिपाई तालुका अध्यक्ष सनी खरात यांनी सांगितले.

आमदार संजय गायकवाड यांच्यावर कारवाईचे निवेदन दहिवडी पोलीस स्टेशन दहिवडी येथे देणेत आले त्यावेळी रिपाइंचे कार्यकर्ते बापूराव शिंदे,आशिष रणदिवे,गणेश नवगण,अमर गोसावी उपस्थित होते.