कोळी समाज महिलेची अमानुषपणे हत्या करणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्या..! वाल्या सेने तर्फे पोलिस आयुक्तांकडे मागणी

26

🔸वाल्या सेनेचे १५० युवा समाज सेवक उपस्थित

✒️प्रतिनीधी प्रतिनिधी(संजय कोळी)

नंदुरबार(दि.7जुलै):- वाल्या सेनेतर्फे नंदुरबार जिल्हा पोलिस आयुक्त महेंद्र पंडित यांना कोरीट येथील महिलेचा खून प्रकरणातील प्रमुख आरोपींना अटक करून कडक शिक्षा करावी व अन्य साथीदारांचा असून शोध घेऊन फाशीची शिक्षा करावीअशी मागणी एका निवेदनाद्वारे केली आहे

स्व उषाबाई जाधव (कोळी) वय 45 ३ जुलै २०२१ रोजी मु. पो. कोरीट ता. जि. नंन्दूरबार या गावात खुपच निंदनीय घृणास्पद घटना घडली ती घटनाचे विचार मनात आल्यावर अंगावर शहारे येतात अशी आहे .असा आदिवासी कोळी समाजावरच घृणास्पद घटना घडण्याचे कारण काय त्या नालायक हरामखोरांची हिंमत कशी होते आपल्या आई बहिण भाऊ वडील यांच्या वर असले कृत्य करण्याची खुपच निंदनीय घटना आहे.

या घृणास्पद घटना घडल्याचा जाहिर निषेध कोळी समाज वाल्या सेने धुळे नंदुरबार जिल्हा तर्फे पत्रकान्वये केला आहे . निवेदनावर सौ. गितांजलीताई कोळी,रविभाऊ शिरसाठ,हिराभाऊ वाकडे, दिलीप कोळी, संजय कोळी, सावकार कोळी, भूषण कोळी, सुभाष कोळी, सुनील कोळी, धनंजय कोळी,सागर कोळी,मयुर कोळी, योगेश्वर कोळी, श्रीकांत कोळी, दादाभाई कोळी,पांनबा कोळी,निलेश कोळी, गणेश कोळी, गोपाल कोळी, किरण कोळीआदिंच्या सह्या आहेत यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते