काल महाराष्ट्र शासनाने घाई गडबडीत अनेक ठराव पास केले. हे पास झाल्या नंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतीव समाधान व्यक्त केले व सांगितले की, जनतेच्या भल्याचे निर्णय घेतले याचा आनंद त्यांना राज्याचे प्रमुख म्हणून आहे.
या ठरावातील एक ठराव असा होता की कैकाडी या जातीचा समावेश एस सी अर्थात मागासवर्गीय मधे करण्यात यावा.
कोणत्या जाती मागास ठरवावी हा अधिकार राज्यांना असल्यावर काय होऊ शकते हे यातून दिसून येते.
हे अधिवेशन चालू होण्यापूर्वी दैनिक सोलापूर चे आवृत्त्तीत दैनिक सुराज्य चे मोहोळ येथील प्रतिनिधी माझे मित्र संजय ओव्हाळ यांनी एक बातमी दिली होती.मोहोळ विधान सभा हा मतदारसंघ अनुसूचित जाती साठी एस सी राखीव असताना या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने इंदापूर तालुका जिल्हा पुणे येथील रहिवाशी यशवंत माने याना तिकीट दिले व ते विद्यमान आमदार आहेत.यशवंत माने हे महाराष्ट्रातील व्हीं जे एन टी या प्रवर्गातील कैकाडी या जातीचे आहेत.
महाराष्ट्रातील विदर्भ विभागात ही जात एस सी प्रवर्गात समाविष्ट आहे तर उर्वरित महाराष्ट्रात ती व्हीजेएनटी अर्थात भटके विमुक्त जाती प्रवर्गात समाविष्ट आहे.मोहोळ हा राखीव मतदारसंघ पश्चिम महाराष्ट्र यात येतो म्हणून येथे कैकाडी ह्या जातीचा माणूस आपोआप अपात्र ठरतो.परंतु तसे झाले नाही. यशवंत माने यांनी बुलढाणा येथून अनु. जातीचे प्रमाणपत्र आणले आणि त्या आधारे निवडणूक लढवली.शिवसेना कडून ह्याच निवडणुकीस नागनाथ क्षीरसागर यांनी निवडणूक लढवली होती. (धनगर खाटीक), त्यात ते पराभूत झाले, त्यांनी जात पडताळणी विभागाकडे तक्रार केली परंतु तीचेवर राजकीय दबाव असल्याने त्या समितीने त्यांचे ऐकून ही घेतले नाही.म्हणून मुख्यमंत्री व शिवसेना प्रमुख असलेल्या उद्धव ठाकरे यांचे कडे धाव घेतली.त्यांनी ही तत्काळ सामाजिक न्याय विभागास यशवंत माने यांचे जात प्रकरणाचा तपास करून त्याचा अहवाल सादर करावेत असा आदेश दिला.
इथपर्यंत सारे कांहीं ठीक व नियमाने चालू होते, आपल्या शिवसैनिक आहें, रास्त तक्रारीचे निवारण करावे हा शिवसेना प्रमुख म्हणून त्यांचा धर्म व कर्तव्य होते.पण हा भूतकाळ झाला, साहेब मुख्यमंत्री बनले ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हित सबंध अबाधित ठेवण्यसाठी ही बाब नागनाथ क्षीरसागर विसरले होते.
आ. यशवंत माने हे ना. अजित दादाचे विश्वासू .त्यांना दुखावणे सत्तेला परवडणारे नाही.म्हणून यशवंत माने यांचे संरक्षण करण्या साठी सरकार त्यांचे पाठीशी उभे राहिले.सामाजिक न्याय विभागचे मंत्री ना. धनंजय मुंडे हे आहेत व ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत.भारतात जाती चे वर्ग (class) कसे पडले?हिंदू मधील जाती व्यवस्थेचे सामाजिक स्तर हे वर्ग निच्छित करतात.आरक्षण हे सुट्टे जातवार नाही ते वर्गीकरण पद्धतीने दीले गेले आहे.गाव, गानाहस, गावकुसा बाहेरील लोक समूह आणि गावाचे नागरी संस्कृतीशी संबंध नसणारे स्वतंत्र जीवन जगणारे समुहा अंतर्गत समूह नियत्रंण असणारे (जात पंचायत)असे हे वर्ग आहेत.
गावातील प्रमुख लोक जे उच्च सामाजिक दर्जाचे आहेत ते ब्राह्मण(पुरोहित), मराठा (क्षत्रिय) ज्यांचे कडे गावाचे अंतर्गत व बाह्य रक्षण करण्याचे काम आहे, कारागीर जाती समूह जसे की सुतार , लोहार कुंभार इत्यादी(ओबीसी) या जाती गावकुसात राहतात(वेशीच्या आत) वेशी बाहेर राहणारे महार , मांग ढोर इत्यादी.
या गावावरून त्या गावाकडे भटकंती करत जगणारे डोंबारी, माकडवाले, मासरी, पिंगळा, कुडमु डे जोशी, इत्यादी सह कैकाडी आदी भटके विमुक्त तर जंगलाचे आधारे राहणारे आदिवासी , जसे की पारधी ,महादेव कोळी आदी या वर्गात प्रतेक जात स्वंतत्र आहे तिच्या चालीरीती स्वंतत्र आहेत आमचे सहकारी सूर्यकांत भिसे वेळापूर यांनी भटक्यांची भ्रमंती अशी मालिका लावली होती व अनेक जातीची वैशिष्टे त्यांनी अभ्यासून लिहली होती.भटके विमुक्ता साठी नेमलेल्या केंद्रीय बाळकृष्ण रेणके आयोगाचे ते सचिव होते.
अनुसूचित जाती या तील बहुतेक जाती ह्या मास, कातडी, कातडी प्रक्रिया उद्योग यांचेशी किंवा निकृष्ट काम जसे की मैला वाहवू न नेणें शी संबधित आहेत.पूर्वी गाव गाड्यात मृत जनावरे ओढून नेण्याचे काम महार करत, त्याचे कातडे काढून ते ढोर जातींना विकत ढोर जात त्या कातडी ला कुंडात बुडवून त्यावर चुन्याची प्रक्रिया करून त्याचे केस साफ करून टी कातडी झाडा चे सालीच्या रंगा द्वारे रंगवून कातडी कमवित त्या पासून चर्मकार मोट, नगारे, हलगी , ढोल, याला लागणारी कातडी वापरून बनवत तसेच पादत्राणे ही बनवत ही कामे अस्वच्छ गृहीत धरून देवतांचे पूजेत सोवळे असल्या मुळे ती कामे करणारे यांचा स्पर्श किवा त्यांचा मंदिर प्रवेश निषिद्ध मानण्यात आला.या जाती पैकी चर्मकार वगळता इतर जाती समूहाचा आहार गोबमास होता.भटके विमुक्त जाती समूह गो मास भक्षण करीत नाहीत, हे त्यांचे वैशिष्ट्य आहे ते उंदीर, पारवे, ससे, डुक्कर, हरीण, घोरपड, असे कोणतेही प्राणी व पक्षी खातात.
माजी आमदार लक्ष्मणराव माने हे कैकाडी समाजाचे आहेत. त्यांनी उपरा नावाचे आत्मकथन लीहले आहे. त्यात ते गव्हाचे मोकळ्या झालेल्या शेतात उंदीर शोधण्याचे वर्णन करतात.
निलंगा येथील विलास माने यांचे कत्ती नावाचे आत्मकथन आहे.
गावाचे कडेने पांदी ने उगवलेल्या वेलतार जातीचे (एक प्रकारची वेलं जीच्या तून चिक निघतो) ती झाडावर चढते, तिचे फोक कत्ती चे सह्य्याने काढून त्यास चिरून त्यास विणून कोंबड्या झाकन्या साठी मोठी डालगि बनवत (झाप) हा व्यवसाय कैकाडी समाजाचा होता.डालगी किंवा झाप बनवण्यासाठी जे वेल लागायचे ते एका गावी मिळणे कठीण होते तसेच त्याचा विक्रय एकाच गावात करणे ही अश्यक्य होते म्हणून हा समुदाय गाढवावर प्रपंच लादून भटकंती करत असे. जर माजी आमदार लक्ष्मणराव माने भटके विमुक्त नसते तर त्यांनी 1984 साली भटक्या विमुक्तांच्या ओळखी साठी महाराष्ट्रात शोध यात्रा काढलीच नसती. बंद दरवाजा हे त्यांचे चळवळीचे मुखपत्र होते जे सातारा करंजे मार्ग येथून प्रसिद्ध होत होते.
माझे वडिलांनी माळीनगर येथे भटक्या विमुक्तांचा मेळावा भरवला होता. त्यास लक्ष्मणराव माने, बाळकृष्ण रेनके, हरिभाऊ राठोड, आसाराम जाधव अशी मंडळी उपस्थित होती.
अलीकडचा राजकीय पक्षाचा राजकीय व्यवहार पाहिला तर असे लक्षात येते की, एस सी चे राखीव जागेवर उमेदवारी देताना या वर्गातील नवबौध्द समाजाला पूर्णपणे नाकारले गेले आहे.
ही बाब राष्ट्रवादीत तर ठळक पने दिसून येते.नव बौद्ध समाजाने जे सांस्कृतिक क्रांतीचे हत्यार उचलले त्याचा रोष म्हणून हे घडले. एस सी मधील मातंग समाजाला ही चळवळीचे आत्मभान जस जसे येऊ लागले तस तसे हा ही समाज पक्ष उमेदवारी मिळवण्या पासून दूर जाऊ लागला.मागासवर्गीयातील पुढारलेली चर्मकार ही जात लोकसंख्या ने अत्यल्प असली तरी त्याचे प्रतिनिधित्व जादा आहे.माळशिरस व फलटण हे नवीन रचनेत राखीव झाल्या नंतर सलग तीन ही वेळेस या दोन्ही मतदार संघातून फक्त चर्मकार जातीचे उमेदवार देण्यात आले आहेत.
इतकेच नाही तर महाराष्ट्रात या जाती प्रवर्गाचे नसलेले परंतु बनावट खोटी कागदपत्रे सादर करून बनावट जाती प्रमाण पत्रा आधारे उमेदवारी मिळवणारे खरया जाती वर्गातील लोकावर भारी पडले आहेत.धनगर खाटीक ही जात मागास वर्गातील एस सी मधे आहे.माळशिरस तालुक्यातील एस सी राखीव जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस कडून उमेदवारी मिळवणारे उत्तमराव जानकर हे या जातीचे असते तर त्यांनी धनगर समाजाला एस टी प्रवर्गात समाविष्ट करा म्हणून अखेरचा लढा उभा केलाच नसता.
किंवा ते धनगर समाजाचे नेते म्हणून ही गणले गेले नसते.
बेडा जंगम ही लिंगायत समाजातील एस सी प्रवर्गातील एक जात आहे. सोलापूर येथील लिंगायत मठाचे मठाधिपती असलेल्या महाराजांनी बनावट जात प्रमाणपत्र मिळवले तिथे भाजपचे खरे मागासवर्गीय असलेले माझे वर्ग मित्र शरद बनसोडे यांना त्यांनी मागे ढकलले आणि ते खासदार झाले.
राजकीय व्यवस्थेत या पुढे बहुजनातिल बहुसंख्याक जाती ना शिरूच द्यायचे नाही अशी मानसिकता बहुतेक विकसित झाली असावी व हा व्यवहार राज्यकर्त्यां चा दृष्टिकोन दर्शवते
बऱ्याच राखीव जागेवर उमेदवार बाहेरून लादले जातात असे ही माझे निरीक्षण सांगते.याचे बहुतेक कारण आपल्याच विभागातील मागास वर्गीय व्यक्तीचे पर्यायी सत्ता केंद्र बनू नये असे तेथील दंबंग नेतृत्वास वाटत असावे.यात मला तरी हेच कारण दिसते स्थानिक मागासवर्गीय नेत्यांनी स्थानिक उच्च वर्णीय नेत्यावर नाराज होऊ नये म्हणून हा उमेदवार पक्षाने वरूनच पाठवला. त्यास ना इलाज आहे म्हणून हतबलता चे कृत्रिम प्रदर्शन करत राहवयाचे असे हे सूत्र आहे.त्या त्या तालुक्यातील जनतेने असा उमेदवार त्यांचे पक्षा द्वारे आयात केला तर त्याचे विरोधात मतदान करण्याचे धोरण स्वीकारले तरच स्थानिकांना किमान न्याय मिळेल.स्थानिक पक्षीय नेतृत्वाने ही आपला दृष्टिकोन थोडासा व्यापक केला पाहिजे. ज्या स्थानिक जनतेने त्यांना सातत्याने पाठिंबा दिला त्यांचे खांद्याला खांदा लावून राजकीय लढाया लढल्या त्या स्थानिकांना डावलून कोणते समाधान त्यांना मिळणार?ओबीसी समाज 52% असून ही वरिष्ठ सत्ता केंद्रा पासून तो वंचितच आहे.
त्याचा निर्धारित वाटा ना विधानसभेत ना लोकसभेत ही व्यवस्था वर्षानू वर्ष चालू आहे. जी तुरळक समृद्ध बेटे या वर्गात निर्माण झाली आहेत, ती घराणे शहीत रुपांतरीत झाली आहेत व याच घाराण्या भोवती सत्ता फिरते आहे.हीच घराणी ओबीसी समूहाची ईश्वरीय ठानी झाली आहेत.ओबीसी वर्गास स्थानिक स्वराज्य संस्थेत आरक्षण देऊन मर्यादित सत्ता दिली गेली होती. ती ही आत्ता नामशेष झाली आहे.एस सी चे आरक्षित मतदार संघात निवडणूक जिंकू शकणार नाहीत असे राजकीय पक्ष , या वर्गातील अपक्ष जे सत्ता विहीन, आर्थिकदृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या व राजकीय दृष्ट्या कमजोर आहेत त्यांनी त्या लढवल्या तरी व्यवस्थेला कोणता फरक पडतो?आम्हाला लोकशाही असल्याचा आभास होतो.खारघर येथील ओबीसी चे नेते डिजिटल ऑर्गनायझेशन पार्टी चे संस्थापक अध्यक्ष आमचे सहकारी डॉ वसंत राठोड यांनी फार सुरेख शब्दात वर्णन केले.ते निरंतर पास यादीत व आम्ही निरंतर नापास यादीत असे निवडणुकीचे चित्र राहिले आहे.
या गंभीर बाबी कडे समग्र समाज धुरिणांनी एकत्रित येऊन उपाय काय हे शोधलेच पाहिजेत. व ही खरी गरज आहे. इथे जाता जाता एकच सांगतो की,महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी आ. यशवंत माने यांचे जात दाखला बाबत तपास करून अहवाल सादर करण्याचे आदेश सामाजिक न्याय खात्यास दीले.या खात्याचे मंत्री ना धनंजय मुंडे हे आहेत ते मुख्यमंत्री पदापेक्षा दुय्यम आहेत.त्यांनी अहवाल देण्या ऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षास याची माहिती दिली.आपल्या आमदाराचे भवितव्य धोक्यात आहे असे लक्षात येताच कैकाडी ही जात एस सी वर्गात समाविष्ट करण्याचे धोरण स्वीकारण्यास राष्ट्रवादी ने मुख्यमंत्र्यांना भाग पाडले.फक्त सत्तेच्या मिठाला जागण्या साठी दुय्यम मंत्र्या द्वारे थेट मुख्यमंत्र्यांना आपल्या निर्णयापासून माघार घ्यावी लागली तो त्यांचा पराभव आहे असे मी मानतो.शिवसेना प्रमुख म्हणून शिवसेना कार्यकर्त्यांचे हित रक्षण करण्यास ही ते कमी पडले असे ही मी मानतो.हा ठराव करताना एस सी चे ना नितीन थोरात, ना वर्षा गायकवाड, आम् प्रकाश गजभिये आदी लोक प्रतिनिधी सदनात होते ना?आपल्या प्रवर्गाच्या हिताचे रक्षण करावे असे त्यांना का वाटले नाही?
ही सत्तेची लाचारी एस सी वर्गाचे कायमस्वरूपी नुकसान करणारी आहे.असल्या दलाल वर्गाला हाताशी धरून महाविकास आघाडी सरकार एस सी चे राजकीय हक्काचे मुळावर उठले आहे हेच खरे आहे.जर आत्ताच तुमच्या हक्काचे संरक्षण केले नाही तर दुसरे डॉ बाबासाहेब आंबेडकर रक्षण करण्यास येणार नाही जो समाज त्यांना मिळवून दिलेल्या हक्काचे ही रक्षण करण्यास असमर्थ ठरतो तो समाज गुलाम बनण्याचे दिशेने प्रवास करतो आहे हे निच्छित आहे
तूर्त इतकेच,,,,,,,,,,,,,,,,,!
✒️लेखक:-ऍड अविनाश टी काले(अकलूज ,तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर)मो:-9960178213