लाडेगाव येथील भूमिहीन गायरान धारकांचा सामूहिक आत्मदहनाचा इशारा

28

✒️नवनाथ पौळ(बीड,अंबाजोगाई विभाग प्रतिनिधी)मो-8080942185

केज(दि.7जुलै):-तालुक्यातील लाडेगाव येथील गायरान जमिनीचा वाद आता विकोपाला जाण्याच्या मार्गावर आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की मौजे लाडेगाव येथे मागासवर्गीय भूमिहीन गायरान धारक यांचे सर्व्हे नं.143 वहिती करून आपली उपजीविका भागवत आले आहेत.सदर अतिक्रमण हे अनेक वर्षांपासून होते.परंतु काही महिन्यांपूर्वी हे भूमिहीन मागासवर्गीय कसत आलेल्या जमिनीवरील अतिक्रमण हटवण्यात आलेले आहे परंतु सदर गायराणाला लागून चारही बाजूने शेजारील शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे.

त्यांचे अतिक्रमण मात्र तसेच आहे असे निवेदनकर्त्यांचे म्हणणे आहे.ते शासकीय गायरान जमिन सर्वे नं .143 मधील लोकांचे चारही बाजूने असणारे अतिक्रमण हटवण्यात यावे.सर्व्हे नं.143 मधील जमिनीच्या चारही बाजूच्या हद्दी निश्चित करण्यात याव्यात या मागण्या तहसील कार्यालयास दिलेल्या निवेदनात नमूद केलेल्या आहेत. वरील मागण्या मान्य न झाल्यास 9 जुलै रोजी सकाळी 11 वाजता समस्त गायरान धारक सामूहिक आत्मदहन करणार असल्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.