अल्पवयीन मुलीशी विवाह करणे पडले महागात – पतीवर बलात्काराचा गुन्हा दाखल

24

✒️विजय केदारे(नासिक,जिल्हा प्रतिनिधी)

नाशिक(दि.7जुलै):-अल्पवयीनमुलीशी विवाह करून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे मुलगी प्रसूत झाल्याने ही बाब पोलिसात पोहोचली असून याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात बलात्कार बालविवाह प्रतिबंध आणि बाल लंगिक अत्याचार संरक्षण पॉस्को कायद्यान्वये दाखल करण्यात आला आहे करण नंदू जाधव 20 अमृत नगर पाथर्डी फाटा असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे.

पीडिता व संशयित पती पत्नी असून त्यांनी गेल्या वर्षी आदिवासी पद्धतीने विवाह केला आहे मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असताना संशयिताने तीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार व तिच्याशी विवाह केला या काळात शरीरसंबंध प्रस्थापित केल्याने 16 वर्षीय मुलगी गर्भवती राहून तिने गोंडस मुलाला जन्म दिला आहे प्रसूतीसाठी पीडित महिला जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्याने हा प्रकार समोर आला असून अधिक तपास उपनिरीक्षक बरेला करीत आहे