लहुजी नगर. रमाबाई नगर. आझाद नगर. रॉकेल कॉलनीतील नागरिकांना पीटीआर चे वाटप

21

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.8जुलै):- शहरातील अनेक भागात कष्टकरी कामगार यांच्या वस्त्या आहेत तेथील भागातील रहीवाशी अनेक वर्षांपासून हक्काच्या जागे साठी संघर्ष करीत होते पण प्रत्येक वेळी राजकारण त्यांच्यामुळावर उठत होते. पण प्रभाग क्रमांक 8 मध्ये चंद्रकांत खंदारे हे याच नगरातील नगरसेवक असल्याने त्याना या प्रश्‍नाची जाणीव आहे म्हणून त्यानी प्राधान्याने पीटीआर साठी प्रयत्न केला वेळोवेळी पाठपुरावा करुण आज अखेर नागरिकांना त्यांच्या हक्काचे घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रमाई आवास योजनेंतर्गत आता या भागातील नागरिकांना घरकुलाचा लाभ मिळुन माणसाच्या मुलभुत गरजा पैकी निवाऱ्याची सोय झाली आहे.

आजपर्यंतच्या जागेच्या प्रश्नाचा अडसर हा शासकीय योजना मिळवण्यासाठी अडसर ठरत होता तो दुर झाला आहे. त्या मुळे येथील रहीवाशानी नगरसेवक चंद्रकांत खंदारे व नगराध्यक्ष विजयकुमार तापडिया यांचे आभार मानत जाहीर सत्कार केला या वेळी. नगर सेवक कासले साहेब लक्ष्मण गायकवाड. शेख तौफिक. खॉजाभाई त्र्यंबक गायकवाड.जितु इचके. रमाकांत घोबाळे. आतीश खंदारे राहुल लोंढे. शेख इस्माईल. रुस्तुम गायकवाड. सचिन जाधव. तातेराव गायकवाड. विनायक गायकवाड. राजाराम घोबाळे. सखुबाई उनवने. अज्ञानबाई रायभोळे. या सह प्रभागातील महीला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी कांबळे यांनी केला