तात्यासाहेबांच्या सत्यशोधकाचा नवी मुंबईत करण्यात आला सन्मान…

23

🔸पी. डी. पाटील यांना मिळाला राज्यस्तरीय महात्मा जोतीराव फुले आदर्श शिक्षक पुरस्कार…

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

धरणगाव(दि.9जुलै):- येथील सुवर्णमहोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूलचे उपक्रमशिल शिक्षक पी. डी. पाटील यांना एरोली नवी मुंबई येथे कलासाधना सामाजिक संस्था, नवी मुंबई आयोजित ९ जुलै , २०२१ शुक्रवार रोजी राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात नवी मुंबई येथे मान्यवरांच्या उपस्थितीत “राज्यस्तरीय महात्मा जोतीराव फुले आदर्श शिक्षक पुरस्कार ” देऊन गौरविण्यात आले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दरवर्षी कलासाधना सामाजिक संस्था, नवी मुंबई यांच्या मार्फत महाराष्ट्रातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय भरीव व वैशिष्ट्यपूर्ण कार्याची दखल घेऊन काम करणाऱ्या शिक्षक बंधु – भगिनी यांना महात्मा ज्योतिराव फुले आदर्श शिक्षक पुरस्कार, सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार, महाराष्ट्र भूषण पुरस्कार, कलारत्न पुरस्कार, असे विविध पुरस्कार मान्यवरांना प्रेरणा मिळावी म्हणून दिले जातात. यावर्षी देखील महाराष्ट्रातील ५० मान्यवरांना सन – २०२१ पुरस्कार देण्यात आला. सन्मानणीय पुरस्कारार्थी बंधु – भगिनींना सन्मानाचा फेटा – शाल – प्रशस्तीपत्रक – मेडल – सन्मानचिन्ह – ग्रंथ देऊन सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी सुवर्णमहोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल, धरणगाव जि. जळगांव खान्देश येथील पी. डी. पाटील यांची सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय भरीव व वैशिष्ट्यपूर्ण कार्याची दखल घेऊन “राज्यस्तरीय महात्मा जोतीराव फुले आदर्श शिक्षक पुरस्कार ” मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवी मुंबई येथील सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक मा.सुरेश परभत सोनवणे हे होते. प्रमुख विशेष अतिथी म्हणुन जेष्ठ सिने अभिनेता जयराज नायर , विश्वविख्यात जादुगर सतिश देशमुख यांच्यासह प्रमुख अतिथी म्हणून सुरेश बी.माळी ( सेवानिवृत्त शिक्षण उपसंचालक प्रशा. शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र, पुणे ) व विश्वविख्यात चित्रकार दिपक पाटील तसेच कलासाधना सामाजिक संस्था; नवी मुंबईच्या संस्थापक मेघा महाजन, श्रीराम महाजन होते.

विचार मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले व विद्येची खरी देवता सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.या समारंभाला महाराष्ट्रातील पत्रकार बांधव, उपक्रमशिल शिक्षक बंधु -भगिनी, कला शिक्षक, यांच्यासह सामाजिक – सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे सूत्रसंचालन चेतना मॅडम व प्रास्ताविक श्रीराम महाजन यांनी केले तर मेघा महाजन यांनी उपस्थितांचे आभार मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कलासाधना सामाजिक संस्था, नवी मुंबईच्या अध्यक्षा मेघा महाजन, श्रीराम महाजन व संपुर्ण टीम ने परीश्रम घेतल.