गेवराईत करोनाचा आकडा वाढला- पाच गावामध्ये संचारबंदी

19

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)

गेवराई(दि.9जुलै):-तालुक्यात दुसऱ्या लाटेनंतर करोणाचा आकडा कमी झाला होता परंतु मागील तीन चार दिवसापासून बाधिताचा आकडा दिसून येत आहे गेवराई तालुक्यात शुक्रवारी करोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 35 आली मध्ये काजळा येथील 18 रुग्णाचा समावेश असून वाढत्या संख्येमुळे गेवराई तालुक्यातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून गुरुवारी तालुक्यात करुणा बाधिताचा आकडा हा 45होता यामध्ये काजळा येथील 20 लोकांचा समावेश होता दरम्यान करोनाची वाढती रुग्ण संख्या पाहता अधिक रुग्ण असलेल्या पाच गावात कंटेन्मेंट झोनसह संपूर्ण संचारबंदी करण्यात आली आहे करोणाच्या दुसऱ्या लाटेची रुग्ण संख्या इतर जिल्ह्यामध्ये कमी झालेली असताना बीडमध्ये मात्र दीडशे ते दोनशे रुग्ण आढळत आहेत.

यामध्ये गेवराई तालुक्यातील गुरुवारी आकडा 45 होता तर शुक्रवारी हा आकडा 35आला आहे यामध्ये तालुक्यातील काजळा येथील करोना बाधीताचा आकडा मोठा असल्याने हा चिंतेचा विषय बनला आहे येथील नागरिकांना लग्न समारंभातून करोणा संसर्ग झाला असल्याची माहिती असूनही या गावात कालपर्यंत 100 हून अधिक रुग्ण असताना गुरुवारी 20तर आज पुन्हा 18 करोना बाधित रुग्ण आढळून आल्याने काजळे करोनाचे हॉटस्पॉट बनले आहे तर गेवराई तालुक्यातील शेकटा गुळज सुळेगाव पोई तांडा रुग्ण संख्या वाढत आहे या ठिकाणी आरोग्य प्रशासनाकडून नागरिकांची अॅंटिंजन तपासणी टेस्ट केली जात आहे तरी नागरिकांनी बाधितांचा संपर्कात तसेच लक्षणे तात्काळ तपासणी करून घ्यावी असे आवाहन देवळा तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय कदम यांनी केले आहे

 

याच पाच गावात कंटेन्मेंट झोन
================
गेवराई तालुक्यात कोरोनाचा पादुर्भाव वाढताना दिसत आहे यामध्ये काजाळा यासह शेकटा गुळज सुरळेगाव व पोई तांडा इथे रुग्ण संख्या अधिक आहे त्यामुळे हा संसर्ग इतर ठिकाणी होऊ नये म्हणून प्रशासनाकडून अवश्य त्या उपयोजना करण्यात येत आहे तसेच या पाच गावामध्ये दिनांक आठ जुलै पासून कंटेन्मेंट झोन पुढील आदेश येईपर्यंत जाहीर करण्यात आली असून या कालावधीत या ठिकाणी संपूर्ण संचारबंदी असणार आहे असे तहसीलदार सचिन खाडे यांनी सांगितले आहे