पाऊस झाल्याने शेतकरी वर्गात आनंद- शेतकरी लागले कामाला

40

✒️अमोल उत्तम जोगदंडे(धनज-उमरखेड प्रतिनिधी)मो:-8806583158

धनज(दि.9जुलै):- गेल्या १५ ते २० दिवसापासून पावसाने दडी मारली होती. त्यातच दुबार पेरणीच्या संकटाने शेतकऱ्यांना ग्रासले होते. पण दोन दिवसपासुन तालुक्यात बहुतेक गावशिवारात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंद झाला आहे.पाणी प्रश्नाने उग्ररुप धारण केले होते. ते आजही कायम असले तरी शेतीमध्ये पेरलेल्या बि.बियाणांचे कोंब माळरानावर करपण्यास सुरुवात झाली होती. पावसाअभावी पिके करपतील की काय या चिंतेत शेतकरी होता.७ जुलैच्या संध्याकाळपासून वातावरण ढगाळ बनायला सुरुवात झाली आणि रात्रीच पाऊस बरसला आणि शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या.८,९ जुलै रोजी रिमझिम पावसाने शेतकऱ्यांसोबतच सामान्य माणूसही समाधानी दिसून येत आहे.

मुळावा मंडळात सर्वाधिक पेरा सोयाबीनचा असलेल्यामुळे आणि पावसाने दीर्घकाळ विश्रांती घेतल्यामुळे शेतकरी वर्ग हिरमुसला होता. धनज ,आडद,मोहदरी, वानेगाव मुळावा आणि रात्री अनेक ठिकाणी परिसरात पाऊस बरसला आहे. तसेच आज अधुनमधून हलक्या पावसाच्या सरीहजेरी लावत आहे. त्यामुळे शेतीकरी आनंदी झाला हे नक्की.पावसाचे कमबॅक झाल्यामुळे दुबार पेरणीचे संकट टळले असून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाल्याचे चित्र ग्रामीण भागात बघावयास मिळत आहे. येणाऱ्या काळात जोरदार पावसाचे संकेत हवामान विभागाने दिले आहे.