मौजा पिरंजी येथिल अवैध दारूविक्री बंद करा- रिपब्लिकन सेनेची मागणी

23

✒️सिध्दार्थ दिवेकर(उमरखेड,तालुका प्रतिनिधी)मो:-9823995466

उमरखेड(दि 10जुलै):- दि 9 जुलै रिपब्लिकन सेना पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उमरखेड पोलीस स्टेशन येथे भेट देऊन स.पो. निरीक्षक मा. गाडे साहेब यांच्याशी तालुक्यातील चाललेल्या अवैध दारू विक्री, वाढत चाललेल्या चोरीचे व गुन्हेगारीचे प्रमाण, बहुजन समाजाच्या प्रलंबित राहिलेल्या मागण्या व समाजात घडत आसलेले अन्याय याविषयी चर्चा करून त्यावर उपाययोजना करण्याबद्दल सविस्तर चर्चा झाली.

तसेच मौजा पिरंजी ता. उमरखेड येथील अवैध दारूबंदीसाठी पोलीस स्टेशन उमरखेड व पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालय निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी मा.देवानंद पाईकराव (तालुका अध्यक्ष) मा.सुनिल पाटील चिंचोलकर (शहराध्यक्ष), मा.शुद्धोधनभाऊ दिवेकर (शहरउपाध्यक्ष),मा.प्रकाश इंगोले (तालुका सदस्य) तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते.