राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाउपाध्यक्ष पदी सुभाष गायकवाड यांची निवड..

24

✒️अशोक हाके(बिलोली,ता.प्र.)मो.नं.9970631332

बिलोली(दि.10जुुुलै):-तालुक्यातील मौजे ममदापुर येथील रहिवाशी माजी जिल्हापरिषद सदस्य सुभाषरावजी गायकवाड यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ग्रामीण जिल्हाउपाध्यक्ष पदी जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांनी निवड केली आहे…..
नांदेड येथे दिनांक 27 जून रोजी एम जी एम महाविद्यालयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सवांद मेळावा आयोजित करण्यात आला होता,या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष नामदार जयंत पाटील,सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे,माजी खासदार जयसिंग गायकवाड,महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर आदीच्या उपस्थितीत असंख्य कार्यकर्त्यांसह जाहीर पक्ष प्रवेश करून घरवापसी केले होते.गायकवाड हे इ.स 2000 ते 2012 या कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेस बिलोली तालुकाध्यक्ष म्हणून काम पाहिले.

त्यांची राज्यकीय कारकीर्द हे सरपंच,मार्केट कमिटी उपसभापती,पंचायत समिती सदस्य,जिल्हापरिषद सदस्य अशी असून त्यांना राज्यकीय जीवनाचा प्रदीर्घ अनुभव असल्यामुळे पक्षाने पक्ष बांधणीसाठी जिल्हाध्यक्ष हरीहरराव भोसीकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ग्रामीण जिल्हाउपाध्यक्ष पदावर निवड करून नियुक्ती प्रमाणपत्र दिले आहे.या निवडीमुळे बिलोली तालुक्यात राष्ट्रवादीची ताकत वाढण्यास बळ मिळत आहे….

या निवडीबद्दल जिल्हाध्यक्ष हरीहरराव भोसीकर,राष्ट्रवादीचे नेते मोहन पाटील टाकळीकर,प्रदेश युवक चिटणीस वसंत पाटील सुगावे,जेष्ठ नेते मोहनराव पाटील टाकळीकर,प्रदेश युवक चिटणीस वसंत सुगावे,जिल्हा चिटणीस गोसोद्दीन खुरेशी,प्रा जाभरूनकर सर,उत्तम पाटील शेळगावकर,तालुका अध्यक्ष नागनाथ पाटील सावळीकर,कार्याध्यक्ष नागनाथ खेळगे,सामाजिक न्याय तालुका अध्यक्ष गंगाधर प्रचंड,माजी सभापती व्यंकट पांडवे,माजी जिल्हापरिषद सदस्य संग्राम हायगले,भास्कर पाटील भिलवंडे,कुंडलवाडी शहराध्यक्ष नरसिंग जिठ्ठावार,उपाध्यक्ष शेख इशु,युवक शहराध्यक्ष अमरनाथ कांबळे,हणमंत पाटील खुळगे,आदीसह अनेक कार्यकर्त्यांनी शुभेच्या दिल्या आहेत…..