कैलासजी पगारे यांची राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड

19

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.11जुलै):-आंबेडकराईट पँथर ऑफ इंडिया या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कैलास भाई पगारे यांची राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी निवड राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी जाहीर करून त्यांना नियुक्तीपत्र देखील प्रदान करण्यात आले.आम्ही रिपब्लिकन हे समाजजोडो अभियान संपूर्ण देशात राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने हाती घेतले आहे सर्वच समाजघटकांतील अनेक दिग्गज अनुभवी नेते/कार्यकर्ते राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षात दाखल होत आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर,कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या काळातील गतवैभव रिपब्लिकन पक्षाला पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या नेतृत्वाखाली समस्त राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे नेते/कार्यकर्ते जीवापाड मेहनत /परिश्रम घेत आहे.

कैलास पगारे यांची निवड झाल्याने राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाला एक नवी उभारी मिळणार असून त्यांचा संपूर्ण महाराष्ट्रात व महाराष्ट्रच्या बाहेरही संपर्क असल्याने पक्ष गतिमानच होईल.त्यांच्या निवडीचे सर्वच स्थरातून अभिनंदन होत आहे.

निवडी प्रसंगी नाशिक शहराध्यक्ष बाळासाहेब साळवे,राज्य नेते मनोहर जी दोंदे,नाशिक महिला आघाडी शहराध्यक्षा रेश्माताई बच्छाव,महिला शहर उपाध्यक्षा संगीता ताई उन्हवणे,शहर संघटक प्रशांत शिंदे,सातपूर महिला आघाडी रेणुका ताई भाजगी,युवा नेते प्रशांत कटारे,नाशिकरोड राहुल भाई जाधव, रविवार कारंजा हेमंत आहेर,जेष्ठ नेते ओंकार देहाडे,शांताराम दूनबळे,जयश्री ताई वाघ,अनुसया ताई अहिरे,सचिन खरात,राजेश साळुंके,सखाराम शेजुळे,अशोक बच्छाव वाहतूक आघाडी सह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते